शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात  कचरा संकलनात अनियमितता; चौकशी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 20:44 IST

Irregularities in garbage collection करारानुसार घराघरातून कचरा संकलन करावयाचे आहे. परंतु शहरालगतच्या भागात दोन-तीन दिवसानंतर कचरा गाडी येते. बाजारातही नियमित कचरा संकलन होत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी दोन कंपन्याकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली. यात एजी एन्व्हायरो कंपनीकडे झोन १ ते ५ तर बीव्हीजी कडे झोन ६ ते १० ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु दिड वर्ष झाले तरी करारानुसार दोन्ही कंपन्या काम करत नाही. कचऱ्यात माती मिसळत असल्याच्या तक्रारी आहेत. २८ मे रोजी आयोजित मनपा सभेत विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थगन प्रस्ताव आणला होता. यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मंगळवारी यासाठी समितीची घोषणा करण्यात आली.

मनपातील सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीत आरोग्य समितीचे सभापती संजय महाजन, नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार आदींचा समावेश आहे. समिती चौकशी अहवाल महापौरांना सादर करेल. त्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल.

करारानुसार घराघरातून कचरा संकलन करावयाचे आहे. परंतु शहरालगतच्या भागात दोन-तीन दिवसानंतर कचरा गाडी येते. बाजारातही नियमित कचरा संकलन होत नाही. एजी एन्व्हायरो कंपनीने १२३ तर बीव्हीजी कंपनीने ११४ कर्मचारी अतिरिक्त ठरवून त्यांना कमी केले. कर्मचारी कमी असल्याचा कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. झोन स्तरावर मनपा प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले जात नाही.

कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनमानी

दोन्ही कंपन्यांनी नियुक्त केलेले अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचे सोडा नगरसेवकांनाही जुमानत नाही. मनपा अधिकाऱ्यांचे आदेश मानत नाही. कारवाई करण्याची तंबी देताच कंपनीला तोटा असल्याचे सांगून काम बंद करण्याचा इशारा देतात. याचा विचार करता चौकशीची गरज आहे. अन्यथा नागपूर स्वच्छतेत पुन्हा माघारल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न