शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा कट रेतीमाफिया लतिफचाच

By admin | Updated: July 1, 2014 00:55 IST

आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव सिंग यांना रेतीमाफिया लतिफ अन्सारी याच्या इशाऱ्यावरून उडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती ट्रकचालकाच्या जबानीतून पुढे आली आहे.

पोलिसांना धडा शिकवा : आरोपींकडून माहितीवजा कबुली नागपूर : आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव सिंग यांना रेतीमाफिया लतिफ अन्सारी याच्या इशाऱ्यावरून उडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती ट्रकचालकाच्या जबानीतून पुढे आली आहे. दरम्यान, रविवारपासून फरार असलेला कुख्यात लतिफ याला खापरखेडा पोलिसांनी सोमवारी दुपारी वलनी येथे जेरबंद केले. त्याला नंतर पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील वलनी, रोहणा आणि पारडी रेतीघाटांवर लतिफचे वर्चस्व आहे. या रेतीघाटांमधून लतिफ खुलेआम रेतीचे अवैध उत्खनन करतो. ही रेती तो वलनी वेकोलिच्या बंद खदान परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवतो. वास्तवात ही जागा वेकोलिची असली तरी ती लतिफच्या दृष्टीने रेती साठविण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. कारण या भागात त्याची प्रचंड दहशत असल्यामुळे त्याच्याविरोधात कुणीही बोलत नाही. त्यामुळे त्याची चोरी अन् तस्करी बिनबोभाट सुरू असते. रेतीचोरी, हाणामारी आणि अनेक गंभीर गुन्हे ध्यानात घेता तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी लतिफला जानेवारीत तडीपार केले होते. मात्र, तो केवळ महिनाभरच अमरावती-अकोला भागात (कागदोपत्री!) वास्तव्याला होता. या काळात तो वारंवार खापरखेडा, वलनी परिसरात दिसायचा. त्याने राजकीय वजन वापरून महिनाभरातच तडीपारचा आदेश रद्द करवून घेतला. यानंतर त्याने पुन्हा रेतीघाटावर अवैध उत्खनन, चोरी आणि रेतीची विक्री सुरू केली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी कन्हानचे ठाणेदार (परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी) गौरव सिंग यांना रविवारी सकाळी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गौरव सिंग यांनी वेगवेगळी तीन पथके बनवून रेती चोरी करणाऱ्या वाहनांचा आपल्या कर्मचाऱ्यांसह पाठलाग सुरू केला. ते ध्यानात आल्यामुळे आरोपी टिप्परचालक गोधनकर याने पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरव सिंग यांचे वाहनच उडवून दिले. नशीब बलवत्तर म्हणून गौरव सिंग आणि इतर पोलीस कर्मचारी बचावले. या घटनेने पोलीस आणि महसूल यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली. टिप्परचालक आरोपी मंगेश चंद्रभान गोधनकर (२५, रा. वलनी) याला घटनेच्या काही वेळातच पारशिवनी पोलिसांनी कलम ३०७, ३३२, ३७९ भादंविनुसार अटक केली. त्याच्या कबुलीजबाबातून गौरव सिंग यांना उडविण्याचा कट रेतीमाफिया लतिफ यानेच रचल्याचे उघड झाले. एकदा पोलिसांना धडा शिकवला की नंतर ते दूरच राहतात, असे लतिफ म्हणाला होता, असेही चौकशीतून उघड झाले. या धक्कादायक माहितीनंतर पोलीस रविवारी रात्रीपासून लतिफचा शोध घेत होते. आज दुपारी तो वलनीत दडून असल्याची माहिती कळताच खापरखेडा पोलिसांनी कुख्यात लतिफच्या मुसक्या बांधल्या. त्यानंतर त्याला पारशिवनी पोलिसांच्या हवाली केले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या सायंकाळी पारशिवनीत पोहोचल्या. त्या स्वत:च रात्रीपर्यंत कुख्यात लतिफची चौकशी करीत होत्या. (प्रतिनिधी)