शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 09:58 IST

देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले.

ठळक मुद्देअनेकांचे डाव फसलेकोट्यवधींचा फटकामध्य भारतातील बुकी बाजार गारद

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले. नागपूर-विदर्भातील बहुतांश बुकींचे पहिल्यांदाच क्रिकेटच्या सामन्यात डाव उलटे पडले. परिणामी अनेकांना कोट्यवधींचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या फिक्सरला या सीझनमध्ये दीडशे कोटींचा फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. बहुतांश बुकी कोट्यवधींची रक्कम हरल्यामुळे मध्य भारतातील सट्टाबाजार गारद झाल्याची माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.आयपीएल टी-२० क्रिकेटच्या रणसंग्रामाची सांगता रविवारी २७ मे रोजी झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि खासकरून आयपीएलचे सीझन म्हणजे देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजले जाते. रोज कोट्यवधींची उलाढाल अन् लाखोंची कमाई होत असल्याने बुकी मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची खास तयारी करून ठेवतात. जागोजागी हायटेक अड्डे तयार करून क्रिकेट बेटिंगची व्यवस्था करतात. ठिकठिकाणच्या पंटर्सना लाईन देतात.विशेष म्हणजे, नागपूरचे बुकी देश-विदेशात चर्चेला आहेत. कारण चार वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या मॅच फिक्सिंगमध्ये श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मॅच फिक्स करणाऱ्यांमध्ये नागपूरचे बुकी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली होती. त्यानंतर उपराजधानीतील सट्टाबाजार देश-विदेशातील बुकींचे ‘हॉट मार्केट’ असल्याचे आणि येथील बुकी केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील क्रिकेटचा सट्टाबाजार संचालित करीत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या अकराव्या क्रिकेट संग्रामाची तयारी झाली होती. स्थानिक बुकींनी विविध ठिकाणी लाईन देऊन ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी यावर्षी नागपूरात नव्हे तर भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडली होती. तेथून ते मध्य भारतातील क्रिकेट सट्ट्याचा कारभार संचालित करीत होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, इंदूर, भोपाळ, रायपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धासह थेट गोवा, दुबई आणि बँकॉकमध्ये बसलेल्या बुकींच्याही स्थानिक बुकी निरंतर संपर्कात होते.पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीपासून नंतरच्या प्रत्येक घडामोडीवर बुकींनी खयवाडी लगवाडी केली होती. पहिल्या २० सामन्यांपर्यंतची स्थिती स्थानिक बुकींसाठी ठिकठाक होती. नंतर मात्र बुकींची अवस्था पिटल्यासारखीच झाली. संबंधित वर्तुळाच्या माहितीनुसार, ६० पैकी ४५ सामन्यांमध्ये डाव उलटे पडल्याने बहुतांश बुकी गारद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या रिंकूला दीडशे कोटींचा फटका बसला. राज, सोनू कामठीचेही कंबरडे मोडले. रम्यासह भंडारा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि ठिकठिकाणी अड्डे संचालित करणाऱ्या बुकींची कोट्यवधींची हार झाल्याने दाणादाण उडाली.५० टक्के फायनलपूर्वीच आऊट४रविवारी आयपीएलची सांगता झाली. खरेतर फायनलचा सामना बुकीबाजारात सर्वाधिक उलाढालीचा सामना असतो. मात्र, कधी नव्हे एवढी मोठी रक्कम हरल्यामुळे अनेक बुकी हतबल झाले. त्यामुळे रविवारी फायनलच्या सामन्याच्या वेळी मध्यभारतातील सुमारे ५० टक्के बुकी बेटिंगसाठी बसलेच नाहीत. प्रत्यक्ष खयवाडीऐवजी इकडून तिकडे कटिंग करणाऱ्या बुकींनीच फायनलची खयवाडी केली. गेल्या दहा वर्षांत नागपूर-विदर्भातील बुकींना एवढे मोठे नुकसान कधीच सहन करावे लागले नाही, असे एका संबंधिताने लोकमतला सांगितले.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018