शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:41 IST

सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी : संरक्षणाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने महावितरणला शहरातील जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे कर्मचारी घाबरले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच चिंतेने सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरणाची व्यवस्था एसएनडीएलकडे आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी महावितरणला एक पत्र पाठवून कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासही अडचण येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची माहिती होताच कर्मचारी आपल्या भविष्याबाबत घाबरलेले आहेत.त्यांनी सोमवारी ऊर्जामंत्र्यांना आपल्या समस्या सांगत निवेदन सादर केले. त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनी काम सोडून गेल्यास ते बेरोजगार होतील. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात पगारात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यांना पीएलपीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के वेतन दिले जाते. कंपनी व्यवस्थापनातर्फे लिखित आश्वासन मिळाल्यानंतरही त्यांना पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे ते आपल्या पगारापासूनही वंचित होत आहेत. त्यांच्याविरुद्ध बदल्याच्या भावनेने कारवाई होऊ नये. ते पूर्ण इमानदारीने काम करू इच्छितात. त्यांना केवळ आपल्या भविष्याची चिंता आहे.प्रादेशिक संचालक ऐकणार समस्याऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की, सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यांनी महावितरणचे कार्यकारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांना फोन करून कर्मचाºयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.चर्चा योग्य दिशेने सुरूएसएनडीएल कंपनीची महावितरण आणि बँकांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनी केवळ आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंतेत आहे. कंपनीने परिस्थिती पाहून महावितरणला केवळ काही सवलती मागितल्या आहेत. बँकांनाही कमी व्याजावर कर्ज देण्याची विनंती केली आहे. ही चर्चा ज्या दिशेने सुरू आहे त्यावरून परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास आहे.सोनल खुराणाबिझनेस हेड , एसएनडीएल

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी