शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

औरंगाबाद येथील वादग्रस्त स्क्वॅश स्पर्धेची चौकशी १९ पर्यंत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 9:01 PM

राज्य शासनाच्या आदेशावरून १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूर हायकोर्टात माहिती : स्पर्धेत ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाच्या आदेशावरून १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे.ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली. स्पर्धेचा पाचवा विजेता ठरविण्यासाठी ‘सेटिंग’ करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाने स्पर्धेची चौकशी सुरू केली आहे. स्पर्धेचा रेकॉर्डही न्यायालयासमक्ष सादर करण्यात आला होता. न्यायालयाने आवश्यक पडताळणी करून रेकॉर्ड शासनाला परत केला आहे. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार रेकॉर्ड सादर केला होता.स्पर्धेत सहभागी खेळाडू आरब जांभुळकरचे वडील अशोक जांभुळकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक आर. डी. महादवाड यांचा मुलगा रितेश महादवाड याला सामना न खेळविताच पाचवा विजेता ठरविण्यात आले. आरबने पाचवा विजेता ठरविण्यासाठी सामना खेळविण्याची विनंती आयोजकांना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणावर आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाHigh Courtउच्च न्यायालय