शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये प्रचंड घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:12 IST

जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.

ठळक मुद्देपती-पत्नी एकत्रीकरणा ऐवजी विभक्तीकरण : जि.प. प्रशासनाकडे तक्रारींचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.अनेक शिक्षकांचे पती-पत्नी एकत्रीकरण न होता उलट विभक्तीकरण झाले आहे. एकत्रीकरणाच्या नावावर पती-पत्नीपैकी एकाची त्यांचे जोडीदाराचे शाळेच्या ३० किलोमीटरच्या आत बदली करण्यात आली तर त्याचवेळी दुसऱ्याची मात्र असलेल्या शाळेमधून इतरत्र बदली करण्यात आली किंवा विस्थापित करण्यात आले. अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना ज्या शाळांमध्ये बदली मिळाली नाही त्याच शाळेत त्यापेक्षा सेवाकनिष्ठ व त्याच संवर्गातील शिक्षकांना मात्र बदली मिळाली आहे. तर दुसरीकडे बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर संवर्ग एकमधील काही बोगस बदलीपात्र शिक्षकांनी जवळच्या शाळा मिळवल्या. त्यामुळे अशा बोगस बदली लाभार्थींच्या विरोधात अनेक शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. एवढेच नव्हे तर बदलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेल्या अन्यायाबद्दल मागील दोन दिवसात जि.प.प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात यावी व बदली अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यात यावा. तसेच खोटी माहिती देणाºयांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता विस्थापित व अन्यायग्रस्त शिक्षकांकडून होऊ लागली आहे.याबाबत नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांचे नेत्रृत्वातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांची भेट घेऊन चर्चा केली. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन अन्यायग्रस्त व विस्थापित शिक्षकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात लीलाधर ठाकरे, सुनील पेटकर, सुधाकर मते, मुरलीधर काळमेघ, चंद्रकांत मेश्राम, अनिल नासरे, शंकर येनुरकर, मोहन जुमडे आदी पदाधिकारी सहभागी होते. हिंदी माध्यमांच्या शाळांवर मराठी शिक्षकांची बदलीअनेक शिक्षकांची अर्ज करूनही बदली करण्यात नाही तर अर्ज न करताही अनेक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिक्षकांना बदलीने पदस्थापना दिल्या गेल्या तर हिंदी माध्यमाचे शिक्षक मात्र विस्थापित करण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा