शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

११७ कार्ड्स वापरून ‘एटीएम हातचलाखी’चे आंतरराज्यीय रॅकेट

By योगेश पांडे | Updated: August 22, 2024 16:59 IST

आरोपींना उत्तरप्रदेशातून अटक : २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, चार दिवसांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एटीएम मशीनमध्ये पैसे काढायला आलेल्या बॅंक ग्राहकांना टार्गेट करून कार्ड बदलवत गंडविणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. आरोपींकडे पोलिसांना विविध बॅंकांचे ११७ एटीएम कार्ड आढळले व त्यांच्या माध्यमातूनच आरोपी ‘एटीएम हातचलाखी’चे आंतरराज्यीय रॅकेट चालवत होते. तिघांमध्ये दोन जण मुंबईचे रहिवासी आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

१६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त अभियंता पांडुरंग नारायण कुर्वे (७२, भरतनगर) हे पैसे काढण्यासाठी रवीनगरातील एचडीएफसीच्या एटीएममध्ये गेले होते. पैसे काढत असताना अचानक एक पुरुष आतमध्ये आला व माझे पैसे एटीएममध्ये अडकले आहे. तुमची रिसिप्ट अडकली आहे. तुम्ही ती रिसिप्ट काढण्यासाठी परत एटीएम कार्ड स्वॅप करा असे त्याने म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून कुर्वे यांनी मशीनमध्ये एटीएम कार्ड स्वॅप केले. त्यावेळी आरोपीने त्यांचा पिनकोड पाहिला. त्यानंतर त्याने बोलताबोलता कुर्वे यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातून एकूण ९० हजार रुपये काढल्याचा त्यांना एसएमएस आला. यामुळे घाबरलेल्या कुर्वे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच आजुबाजूच्या सीसीटीव्हीमध्येदेखील पाहिल्यावर एकूण तीन आरोपी असल्याची बाब समोर आली. ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपी जबलपूरमार्गे उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्याची माहिती कळाली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील पथक प्रयागराजकडे रवाना झाले. पोलिसांनी सय्यद खान कमालुद्दीन खान (३४, वडाळा, मुंबई), आलोककुमार बालकृष्ण गौतम (३२, प्रतापगड, उत्तरप्रदेश) व मोहम्मद कलीम उर्फ मोहम्मद नसीम (२१, शिवाजीनगर, मुंबई) यांना २१ ऑगस्ट रोजी अटक केली. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना नागपुरात आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, मंगेश डांगे, नवनाथ ईसाये, अभय पुडके, राजेश सोनावणे, मुनिन्द्र युवनाते, दिनेश जुगनाके, अमित भुरे, अंकुश घटी, प्रवीण शिंदे, उज्वल पाटेकर, सतिश कारेमोरे, आशीष जाधव, रोमीत राऊत, विक्रमसिंह ठाकूर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारमधून येत करायचे नागरिकांना ‘टार्गेट’पोलिसांनी तीनही आरोपींकडून आठ लाख व अकरा लाख रुपये किंमतीच्या दोन कार, तीन महागडे मोबाईल आणि ११७ एटीएम कार्ड असा २०.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी महागड्या कारमधून येत नागरिकांना टार्गेट करायचे. एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगत ते नागरिकांची दिशाभूल करायचे व हातचलाखीने कार्ड बदलायचे. त्यांचा पिनकोड वापरत पैसे काढायचे. विशेषत: महिला व वृद्ध नागरिक त्यांच्या निशाण्यावर असायचे. नागपुरात त्यांनी अशा प्रकारे किती जणांना गंडा घातला याची चौकशी सुरू आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर