शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एटीएम स्विच ऑफ करून रोकड उडविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:21 IST

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून आतमधून रक्कम उडविणाऱ्या हरियाणातील एका टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला. आसिफ खान जुम्­मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली

ठळक मुद्दे दोन आरोपी जेरबंद : एटीएमची चावी आणि २२ एटीएम कार्ड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून आतमधून रक्कम उडविणाऱ्या हरियाणातील एका टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला. आसिफ खान जुम्­मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची कबुली घेऊन २२ एटीएम कार्ड, मोबाईल आणि रोख रकमेसह पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आसिफ आणि शहादत हरियाणा राज्यातील मेवात येथील रहिवासी आहेत. एटीएममधून बेमालूमपणे रोकड काढण्यात ते सराईत आहेत. त्यांची एक मोठी टोळी असून वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या शहरात ते विशिष्टप्रकारे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करतात आणि आत मधून रोकड उडवतात. एटीएमचा वरचा बॉक्स उघडणारी मास्टर चावी, पाना आणि पेचकसही त्यांच्याकडे असते. विशेष म्हणजे,जोपर्यंत बँक अधिकारी एटीएममधील रकमेचा हिशेब करत नाहीत तोपर्यंत ही चोरी लक्षात येत नाही.नागपुरात सक्करदरा, नंदनवन, वर्धमान नगर, हिंगणा आणि शहरातील अनेक भागात एटीएम मधून त्यांनी अशाप्रकारे लाखो रुपये काढून घेतले.अशी आहे कार्यपद्धतआरोपी भल्या सकाळी एटीएममध्ये शिरतो. त्याच्या जवळच्या एटीएम कार्डचा वापर करून व्यवहार सुरू करतो. काही वेळासाठी पाना घालून एटीएम मशीन ब्लॉक केली जाते. त्यानंतर एटीएमच्या वरचे झाकण उघडून आरोपी तो व्यवहार अर्धवट राहील, अशी व्यवस्था करतात. त्यामुळे कॅश शटरमध्ये रोकड अडकून पडते. आरोपी ही रक्कम काढून पुन्हा दुसरा असाच व्यवहार करतात. अशा प्रकारे एका एटीएममध्ये पाच ते दहा वेळा रक्कम काढल्यानंतर आरोपी तेथून निघून जातात.असा लागला छडानंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदिपान पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने मास्क लावून असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र त्याच्या दुचाकीचा माग काढत पोलीस सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये पोहोचले. तेथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात या दोघांनी शहरातील विविध भागात असलेल्या एटीएममधून लाखो रुपये काढले आणि भंडाऱ्याला गेले. भंडारा तसेच मौदा येथील एटीएममध्ये त्यांनी चोरी केली आणि परत नागपुरातील हॉटेलमध्ये आले अन् त्यांची वाट बघत असलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.विमान प्रवास करून चोरीआरोपी आसिफ आणि शहादत यांचे काही साथीदार मुंबईत असल्याचे समजते. ही हाय प्रोफाईल टोळी वेगवेगळ्या शहरात एटीएम फोडण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करतात. या दोघांनी पोलिसांना नंदनवन, गिट्टीखदान, वाडी, प्रतापनगर आणि रेल्वेस्टेशन परिसरातील पाच एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदिपान पवार यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक शंकर धायगुडे, हवालदार संजय साहू, नायक विकास टोंग, संदीप गवळी, शिपाई प्रवीण भगत, विनोद झिंगारे, प्रेम कुमार खैरकर, स्वप्निल तांदूळकर, सुरेश तिवारी आणि पंकज पाटील आदींनी ही कामगिरी बजावली. आरोपींकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरीArrestअटक