शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कुणी वाघ घेता का वाघ...! घटत्या जंगलात वाढत्या संख्येमुळे काैतुकासाेबत चिंताही

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2023 12:48 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : दीड वर्षात वाघाने मारली १०० वर माणसे

निशांत वानखेडे

नागपूर :वाघाची जागतिक राजधानी म्हणून नागपूर-विदर्भाकडे पाहिले जाते आणि गेल्या काही वर्षांत प्रयत्नांमुळे वाढलेली वाघांची संख्या ही काैतुकास्पद बाब ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत व्याघ्र हल्ल्यात माणसांचे बळी गेल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकताच चंद्रपूरच्या ताडाेबातील वाघांच्या स्थानांतरणाचा विचार बाेलून दाखविला आहे. घटत्या वनक्षेत्रात वाढणारी वाघांची संख्या हे चिंतेचे कारण ठरले असून विदर्भातून वाघ घेता का वाघ... अशी परिस्थिती आली आहे.

गेल्या वर्षी चंद्रपूर, गडचिराेली व नागपूर भागात वाघांच्या हल्ल्यात ८० माणसांचा बळी गेला. यावर्षीही जानेवारी ते १८ जुलैपर्यंत वाघाने हल्ला करून १९ माणसे मारून टाकली. धक्कादायक म्हणजे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र हाेताना दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या चंद्रपुरात अधिक आहे. येथे २०१८ पासून २०२२ पर्यंत १३५ च्या वर माणसांची वाघांनी शिकार केली आहे. यात २०१८ मध्ये १५, २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २५ आणि २०२१ मध्ये ३५, तर २०२२ मध्ये ४६ लाेकांना वाघाने लक्ष्य केले. त्यामुळे पर्यटकांना वाघांचे आकर्षण असले तरी जंगलाच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मात्र भीतीचे कारण ठरला आहे.

जंगल घटले, वाघ दुप्पट

मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण म्हणजे वाघांची संख्या वाढत असताना वनक्षेत्र मात्र मर्यादित आणि घटत चालले आहे. चंद्रपूरचा विचार केल्यास ताडाेबा अभयारण्याचा काेअर एरिया ६२६ चाैरस किमी आणि बफर क्षेत्र ११२५ चाै.किमी. असा १७५० चाै.किमी.चा एरिया आहे. यात शेती, वनदावे आदींमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. दुसरीकडे वाघांची संख्या मात्र दुप्पट वाढली आहे. देशात २००६ मध्ये १४०० च्या वर असलेले वाघ २०२२ पर्यंत ३००० च्या वर झाले आहेत. यात ताडाेबाचे वाघ १२५-१५० वरून ३०० च्या वर पाेहचले आहेत. त्यामुळे हा अधिवास कमी पडत आहे.

जेवढे जंगलात, तेवढे बाहेर

वाघ जेवढे जंगलात आहेत, तेवढेच ते बाहेरही आहेत. अधिवास कमी पडत असल्याने वाघांनी विदर्भातील खुरटे जंगल, शेतीलाही अधिवास बनविले आहे. इथून संघर्षाची ठिणगी पडली. पूर्वी गडचिराेली भागात कमी दिसणारे वाघ आता भरपूर वाढले आहेत व त्या भागात माणसांचा बळी घेत आहेत. उमरेड-कऱ्हाडला वनक्षेत्रातही असाच संघर्ष वाढला आहे.

वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू

- २०२२ मध्ये

चंद्रपूर- ३७, ताडाेबा-८, चंद्रपूर एफडीसीएम-२ : गडचिराेली-२६, नागपूर-७

- २०२३ जुलैपर्यंत

चंद्रपूर-१०, चंद्रपूर एफडीसीएम-२, ताडाेबा-३ : मेळघाट-१, पेंच-१, नागपूर-३

- केवळ चंद्रपुरात : २०१८-१५, २०१९-२५, २०२०-२५, २०२१-३५, २०२२-४७.

शिकारी टाेळ्याही सक्रिय

व्याघ्र शिकार प्रकरणे गेल्या काही वर्षांत घटली हाेती, पण काेराेनानंतर त्यात वाढ झाली आहे. वाघांची संख्या वाढल्याने आंततराष्ट्रीय शिकारी टाेळ्या सक्रिय झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन विभागाने याबाबत अलर्टही जारी केला आहे. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात वन विभागाची माॅनिटरिंग कमजाेर पडत असल्याचे बाेलले जाते.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघVidarbhaविदर्भ