शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पदार्थांना सुरक्षित ठेवणारे उपकरण तयार करून मिळविले आंतरराष्ट्रीय पेटंट; नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संशोधन

By आनंद डेकाटे | Updated: October 31, 2025 20:01 IST

Nagpur : रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दैनंदिन जीवनात संसर्ग होत विविध पदार्थ नष्ट होतात. या पदार्थांना संसर्गापासून रोखत निर्जंतुकीकरणासह पदार्थांना सुरक्षित ठेवणारे नाविन्यपूर्ण उपकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. 'अँटीमायक्रोबियल कोटिंग ऍप्लिकेशन वैद्यकीय उपकरण' विकसित करण्यासह आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवित विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरु डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. यूकेमध्ये या उपकरणाची डिझाइन नोंदणी झाल्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.

या प्रकल्पात प्राची खोब्रागडे यांच्यासोबत मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभागातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यजुर्वेद नरहरी सेलोकर आणि रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र डोंगरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यजुर्वेद सेलोकर यांच्या सहयोगाने या टीमने हे संशोधन पूर्णत्वास नेले. दैनंदिन जीवनात संसर्गाला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची ही एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धत ठरणार आहे.

हे यश प्राची प्रदीप खोब्रागडे, डॉ. राजेंद्र सुखदेवराव डोंगरे आणि यजुर्वेद नरहरी सेलोकर यांच्या नावे नोंदवले गेले आहे. हे पेटंट म्हणजे डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या बौद्धिक वारशाला दिलेली गुरुदक्षिणाच आहे.

कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर करडे आणि मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले यांनी संशोधकांच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे.

कोविडनंतरच्या काळात महत्त्वाचे संशोधन

कोविड-१९ च्या साथीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आपण हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरतो, पण अनेक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू ज्या धुता येत नाहीत, त्या स्वच्छ ठेवणे एक आव्हान होते. यावर उपाय म्हणून विकसित केलेले हे उपकरण अशा वस्तूंवर अँटीमायक्रोबियल थर चढवते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur students' device secures international patent, preserving substances safely.

Web Summary : Nagpur University students developed an innovative antimicrobial coating device, securing an international patent. This device disinfects and protects substances from infection, inspired by their late guru. The eco-friendly device cleans everyday items, preventing germ spread.
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरEducationशिक्षण