शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मृत्यूंच्या चौकशीसाठी नवीन एसआयटी स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 21:13 IST

राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देकीटकनाशकांचे बळी : हायकोर्टात अर्ज : शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.नवीन एसआयटी स्थापन केल्यानंतर तिला चौकशी पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करून देण्यात यावा, चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात यावा, चौकशीत दोषी आढळणारे शासकीय अधिकारी व कीटकनाशके उत्पादक कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूंची थातूरमातूर चौकशी करून डोळ्यांत धूळफेक करणारा अहवाल देणाऱ्या एसआयटीमधील अमरावती विभागीय आयुक्त (अध्यक्ष) व अन्य सदस्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि या एसआयटीचा अहवाल रद्द करण्यात यावा अशी विनंतीही जम्मू आनंद यांनी या अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन राज्य शासनाला यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. जम्मू आनंद यांची यासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे तर, शासनातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्नअमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीचा अहवाल शेतकरी व शेतमजुरांची थट्टा करणारा आहे. कर्तव्यात कसूर करणारे शासकीय अधिकारी व बोगस कीटकनाशके बाजारात विकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात अहवालात काहीच म्हटल्या गेले नाही. उलट, शेतकरी व शेतमजुरांवरच गुन्हे नोंदविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यावरून या प्रकरणात मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते असा आरोप जम्मू आनंद यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी