शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

वसीम जाफरच्या समर्पित वृत्तीपासून प्रेरणा घ्या : शशांक मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:40 IST

वयाच्या ४१ व्या वर्षी समर्पित वृत्तीने खेळणाऱ्या वसीम जाफरसारख्या अनुभवी खेळाडूपासून प्रेरणा घेत शिखर गाठण्याचे प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन (आयसीसी) अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना दिला.

ठळक मुद्दे ‘चॅम्पियन’ विदर्भ संघाच्या सत्कार सोहळ्यात युवा क्रिकेटपटूंना दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाच्या ४१ व्या वर्षी समर्पित वृत्तीने खेळणाऱ्या वसीम जाफरसारख्या अनुभवी खेळाडूपासून प्रेरणा घेत शिखर गाठण्याचे प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन (आयसीसी) अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना दिला.सलग दुसऱ्यांदा रणजी आणि इराणी करंडक विजेत्या विदर्भ संघाचा शनिवारी व्हीसीए (सिव्हील लाईन्स)स्टेडियमच्या हिरवळीवर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून मनोहर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आजच ४१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या जाफरचे तोंडभरुन कौतुक केले. यंदाच्या मोसमात चार शतकांसह सर्वाधिक १०३४ धावा काढणारा जाफर सरळ बॅटने खेळून केवळ शतकाचा विचार करतो. ३०-४० वर समाधानी राहात नाही, यात त्याची मेहनत आणि समर्पण भाव जाणवतो. युवा सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वत:च्या खेळावरील नियंत्रण आणि व्यक्तिमत्त्वातील संयम ढळू देत नाही. युवा खेळाडूंनी त्याचा सल्ला घ्यायलाच हवा, असा मनोहर यांनी आग्रह केला.देशासाठी खेळण्याचे स्वप्न मनात आणत असाल तर स्वत:ला खेळाप्रति समर्पित करा, असे सांगून मनोहर पुढे म्हणाले,‘ यश डोक्यात गेले तर खेळाडू संपतो. कोचपेक्षा आपण मोठे नाही,हे ब्रिद ध्यानात ठेवूनच दिवसभर सराव करण्याची तयारी ठेवा. छोट्या यशावर समाधानी न राहता झेप कशी घ्यावी याबाबत वसीमकडून शिकण्यासारखे आहे. जाफर किती उपयुक्त खेळाडू आहे,याचे उदाहरण सांगताना मनोहर यांनी निवडकर्ते देवांग गांधी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर अपयशी ठरत असताना भारतासाठी सलामीवीराची भूमिका जाफर बजावू शकतो का, अशी माझ्याकडे विचारणा केली होती, असा खुलासा देखील केला.या प्रसंगी बोलताना व्हीसीए अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जैस्वाल यांनी पाठोपाठ दोन रणजी आणि दोन इराणी करंडक जिंकल्याने विदर्भ खऱ्या अर्थाने चॅम्पियन असल्याचे सांगितले. कोच चंद्रकांत पंडित आणि कर्णधार फैज फझल यांनी देखील सत्काराला उत्तर दिले.यावेळी विनू मंकड करंडक विजेत्या अंडर १९ संघाचा देखील सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सहसचिव हेमंत गांधी आणि कोषाध्यक्ष मुरली पंतुला यांची उपस्थिती होती. संचालन तरुण पटेल यांनी केले. प्रशांत वैद्य यांनी आभार मानले. कार्यक्रमाला खा. डॉ. विकास महात्मे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नगरसेवक प्रगती पाटील,निशांत गांधी यांच्यासह व्हीसीए सदस्य, खेळाडूंचे नातेवाईक आणि माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.विदर्भ क्रिकेट संघाप्रती वाढला आदरइराणी करंडक विजेतेपदाबद्दल मिळालेली दहा लाखाची रक्कम संघाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना दान केल्याची घोषणा संघाचे कोच चंद्रकांत पंडित यांनी आपल्या भाषणात केली. त्याचा उल्लेख करीत शशांक मनोहर म्हणाले,‘ पुरस्काराची रक्कम देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिल्यामुळे माझ्या मनात तुमच्याप्रति आदर वाढला. तुम्ही केवळ चांगले क्रिकेटपटूच नव्हे तर चांगले नागरिकही आहात हे दाखवून दिले. देशवासीयांची तुम्ही मने तर जिंकलीच शिवाय देशभक्कीचा परिचय देखील दिला.’ प्रारंभी उपस्थितांना दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याच सोहळ्यात विनू मंडक करंडक विजेत्या अंडर १९ संघाला दहा लाख रुपये रोख पुरस्कार देण्याची घोषणा व्हीसीएतर्फे करण्यात आली.

टॅग्स :Vidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशनnagpurनागपूर