शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara Fire; मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:02 IST

Bhandara Fire प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात  येईल, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील  सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा :  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू  अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात  येईल, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील  सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले. 

राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते.  गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत  दहा बालकांचा मृत्यु झाला होता.  तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी भेट देवून शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर श्री. कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

तत्पूर्वी राज्यपालांचे सकाळी येथील विश्रामगृहावर आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी  रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी  राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग