शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:00 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देउद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. बचत भवन सभागृहात मंगळवारी अधिकारी व उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, उपाध्यक्ष शेखर पटवर्धन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर व नितीन लोणकर उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी कामगारांचे स्क्रिनिंग, उद्योगाचे निर्जंर्तकीकरण, सुरक्षित अंतर तसेच कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी संदर्भात आकस्मिक भेटीदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व उद्योग क्षेत्रातील पदाधिकारी या पथकात समाविष्ट असतील. गुरुवारपासून हिंगणा एमआयडीसीमधून या भेटी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग समूहाने शिफारस केल्यास कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या सर्व कामगारांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्याची व्यवस्था केली जाईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य असून कामाच्या व जेवणाच्या टेबलवर जास्त कर्मचारी असणार नाहीत. याची दक्षता उद्योगाने घ्यावी. आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगाराची व अभ्यागतांची संपूर्ण माहिती उद्योगाने ठेवावी, असेदेखील रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर