नागपूर : पारशिवनी तालुक्यातील ‘डुमरी फार्म’वरील कचऱ्यात फेकण्यात आलेली औषधे (क ीटकनाशक) व जैविक खते प्रकरणाची अखेर चौकशी सुरू झाली असून, नागपूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) डॉ. अर्चना कडू यांना या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘लोकमत’ने सोमवारी ‘हजारोंची औषधे कचऱ्यात’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करू न कृषी विभागात पीक प्रात्यक्षिकाच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा भंडाफोड केला आहे. यासंबंधी कृषी विभागाचे आयुक्त विकास देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरू न संपर्क साधला असता, त्यांनी सध्या आपण पुणे येथे असून, उद्या (मंगळवारी) नागपुरात पोहोचताच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे; शिवाय दिवसभर कृषी विभागात या घटनेची चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता ‘डुमरी फार्म’ची जबाबदारी असलेले रामटेक चे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्यासह संबंधित मंडल कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्घ कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. माहिती सूत्रानुसार सोमवारी सकाळी एसडीएओ मिलिंद लाड यांनी ‘डुमरी फार्म’ वर जावून घटनेचा पंचनामा केला. तसेच दरम्यान त्यांनी फार्मवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सर्व दोष थोपविण्याचा प्रयत्न करू न, दाटदपटणी केल्याची माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)प्रकरण दडपण्यासाठी आटापिटा ४या घटनेने दोषी अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, काही अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर प्रकरण दडपण्यासाठी आटापिटा केल्याची माहिती पुढे आली आहे. यात संबंधित दोषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या भेटी घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. माहिती सूत्रानुसार या प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन, सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांच्याकडून प्रकरणाची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, त्यानिमित्त राज्याच्या कृषिमंत्र्यांसह कृषी विभागाचे सचिव आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. अशास्थितीत दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘एसएओ’ला चौकशीचे आदेश
By admin | Updated: December 8, 2015 04:06 IST