लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गमती गमतीत वाद झाल्यानंतर मित्रांनीच प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.शुभम गणवीर असे मृताचे नाव असून आरोपींची नावे दर्शन हरिभाऊ फुंडे, कोहिनूर संजय उके,अनिकेत ऊर्फ अनुप ढाले आणि विशाल नारायण मोहरले अशी आहेत. मोहरले वर्धा जवळच्या सालोड हिरापूरचा रहिवासी आहे तर अन्य तिघे वर्धा येथील रहिवासी आहेत.शुभम आणि आरोपी रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आले होते. ते बुटीबोरीच्या कंपनीत काम करायचे आणि हुडकेश्वर मधील दिघोरी टोलनाक्याजवळ एका इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायचे. सोमवारी रात्री त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. एकमेकांचे मित्र असूनही आरोपींनी शुभम गणवीरवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी त्यांचा मित्र अक्षय अशोकराव मेंढे याने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी जुमानले नाही. त्यामुळे गणवीर गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गणवीरचा मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फरार झालेल्या सर्व आरोपींना वर्धा येथून अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करून त्यांचा २ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.
नागपुरात प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:53 IST
गमती गमतीत वाद झाल्यानंतर मित्रांनीच प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.
नागपुरात प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
ठळक मुद्दे मित्रच जीवावर उठले : चौघांना अटक