शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जन माहिती अधिकाऱ्याकडूनच माहितीचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:55 IST

माहितीच्या अधिकारात एका आरटीआय कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेला शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदीबाबतची माहिती मागितली होती. यासंदर्भात जि.प.च्या जन माहिती अधिकाऱ्याने २३ एप्रिल २०१८ ला दिलेल्या माहितीत कार्यालयात यापुढे देवीदेवतांचे फोटो  लावणे आणि धार्मिक उत्सव करण्याबाबत नोटीस काढली असून, अशी कृती करण्यास बंदी घातली आहे, असे उत्तर दिले. हे उत्तर ज्या जन माहिती अधिकाऱ्याने दिले, त्यांच्याच कक्षात धार्मिक देवीदेवतांचे फोटो आढळले आहे. त्यांच्या या कृतीतून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ असेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देमाहितीच्या अधिकारात सांगितले धार्मिक फोटो लावण्यावर बंदी घातली : स्वत:च्या कक्षात धार्मिक फोटो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहितीच्या अधिकारात एका आरटीआय कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेला शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर बंदीबाबतची माहिती मागितली होती. यासंदर्भात जि.प.च्या जन माहिती अधिकाऱ्याने २३ एप्रिल २०१८ ला दिलेल्या माहितीत कार्यालयात यापुढे देवीदेवतांचे फोटो  लावणे आणि धार्मिक उत्सव करण्याबाबत नोटीस काढली असून, अशी कृती करण्यास बंदी घातली आहे, असे उत्तर दिले. हे उत्तर ज्या जन माहिती अधिकाऱ्याने दिले, त्यांच्याच कक्षात धार्मिक देवीदेवतांचे फोटो आढळले आहे. त्यांच्या या कृतीतून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ असेच म्हणावे लागेल.शासकीय कार्यालयात धार्मिक सण साजरा करणे अथवा धार्मिक देवीदेवतांची फोटो लावणे हे भारतीय संविधानानुसार निषिद्ध व चुकीचे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकसुद्धा आहे, तशा सूचना शासकीय कार्यालयांना केल्या आहेत. परंतु बहुतांश कार्यालयात धार्मिक प्रवृत्तीचे अधिकारी आपल्या कार्यस्थळी देवीदेवतांचे फोटो ठेवतात. परंतु संविधानानुसार शासकीय कार्यालयात देवीदेवतांचे फोटो लावणे चुकीचे आहे. आरटीआय कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी जिल्हा परिषदेत धार्मिक फोटो व धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी असल्याबद्दलची माहिती मागितली होती. जिल्हा परिषदेच्या जन माहिती अधिकारी तसेच अधीक्षक वर्ग -२ माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय भारती गेडाम यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या माहितीत कार्यालयातील सर्व अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना अशी कृती करण्यासंदर्भात बंदी घातली आहे, अशी माहिती दिली. परंतु त्यांच्याच कक्षात देवीदेवतांचे फोटो आढळले आहे. त्यामुळे या जन माहिती अधिकाऱ्याची कृती माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.काय आहे परिपत्रकत्यामुळे शासनाने ७ जून २००२ ला एक परिपत्रक निर्गमित करून शासकीय कार्यालयात कोणत्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्र लावावीत याबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत. यात २४ राजकीय व सामाजिक नेत्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही छायाचित्रे लावणे नियमानुसार योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच शासनाच्या मान्यतेशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात व सभागृहात शासन आदेशात मान्य नेत्यांची छायाचित्र वगळता इतर कोणतेही छायाचित्र लावण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहे.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताnagpurनागपूर