शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 00:11 IST

संत्रा उत्पादकाचे होऊ शकते नुकसान

नागपूर : संत्रा पिकावर रस शोषण करणाºया किडीचा प्रादुर्भाव केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या (एनआरसीसी) निष्कर्षास आला आहे. या किडीमुळे १० ते ४० टक्क्यांपर्र्यंत तोडणीला आलेल्या संत्राफळाची गळ होत असल्याने, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संत्रा फळाचा रस शोषण करणारी ही कीड फळ पिकांसाठी गंभीर कीड (पतंग) आहे. रात्रीच्या वेळी पतंग फळाचे रस शोषण करते. त्यामुळे अपरिपक्व संत्रापिकाची गळ होते, फळे सडतात. भारतामध्ये संत्रा पिकावर येणाºया किडीच्या अनेक प्रजातीची नोंद करण्यात येते. त्यात यूडोसीमा प्रजाती ही सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फळ गळतीसाठी कारणीभूत ठरते. ही कीड संत्रा पिकावर रात्रीला अटॅक करते. फळांना छिद्र करून रस शोषण करते. पक्व झालेली अपरिपक्व फळे पिकण्याच्या आधीच गळून खाली पडतात. खाली पडलेल्या फलांवर बुरशीच्या प्रादुर्भावाने फळे सडतात. फ ळे पिकण्याच्या वेळेस या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सडलेल्या फळांना चांगल्या फळांसोबत पॅकिंग केले असता, रोगजनक संक्रमणाच्या माध्यमातून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो व चांगली फळे सडतात, अशी माहिती एनआरसीसीचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिली.किडीवर असे मिळविता येईल नियंत्रण खाली पडलेली फळे गोळा करून जमिनीमध्ये खड्डा कडून गाडून द्यावी. कीड दूर करण्यासाठी सायंकाळी बगीच्यात धूर करावा. पावसाळ्यात बगीच्यासभोवताल आलेल्या वेली, वनस्पती, रोपटी नष्ट करावीत. पसरट भांड्यामध्ये औषध तयार करून झाडाला अटकवावे. कीड नियंत्रणासाठी उपलब्ध असलेली पिशवी झाडाला लटकवावी. कीटकनाशकाची फवारणी करावी.