शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात प्रीती दासची अखेर शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 16:39 IST

शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देब्लॅकमेलिंग, ठगबाजीचा गुन्हे पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांचे जगणे मुश्किल करणारी आणि कित्येकांची फसवणूक करणारी कुख्यात ठगबाज महिला प्रीती दास हिने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे.पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्री करून त्यांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या प्रीतीने पोलिसांच्या दक्षता समितीसह अनेक कथित सामाजिक संघटनेच्या समित्यांवर आपली वर्णी लावून घेतली होती. पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ती समोर राहायची आणि तेथे पोलिस अधिकाऱ्यांसोबत स्वत:चे फोटो काढून घ्यायची. हे फोटो वेगवेगळ्या लोकांना दाखवून ती सावज जाळ्यात ओढत होती. आपले अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याची थाप मारुन ती पोलीस ठाण्यात कोणतेही काम अडले तर मला सांगा, मी करून देते, अशी बतावणी करायची. त्याबदल्यात संबंधिताकडून मोठी रक्कम उकळायची. तिने गुंडांची आणि  नेत्याची एक फळी निर्माण करून पोलीस अधिकाऱ्यांनाही ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. महिला असल्याचा गैरफायदा घेत ती कुणावरही दबाव आणायची. बलात्काराच्या गुन्'ात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळायची. कुणाची रक्कम वसूल करून देण्याची किंवा कुणाच्या घर किंवा जमिनी वर कब्जा मारण्याचीही प्रीती सुपारी घेत होती. तिच्या धाकामुळे लकडगंजमधील एका मेस चालकाने आत्महत्या केली होती. मात्र तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीशी असलेल्या सलगीमुळे हे प्रकरण दडपले होते. प्रीतीच्या पापाचा भंडाफोड होताच तिच्याविरुद्ध पाचपावली, लकडगंज आणि जरीपटका या तीन पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर प्रीतीने पोलीस अधिकाऱ्यांशी असलेली सलगी कॅश करूननिसटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला प्रत्येकानी झिडकारल्यामुळे ती हताश झाली आणि अखेर तिने शनिवारी सकाळी ११ वाजता पाचपावली पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ठाणेदार नगराळे यांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर तिला अटक केली.बघ्यांची मोठी गर्दी!कुख्यात प्रीती पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे कळताच तिला बघण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, हे विशेष!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी