शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या खामल्यातील कुख्यात चेनस्नॅचर मंगलानी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:35 IST

महिलांचे दागिने हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार अनिल मंगलानी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून त्याच्याकडून सोनसाखळी हिसकावून घेण्याचे १० गुन्हे पोलिसांनी वदवून घेतले. पाच लाखांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. मंगलानी गेल्या अनेक वर्षांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देदीड महिन्यात १० गुन्हे : पाच लाखांचे दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांचे दागिने हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार अनिल मंगलानी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून त्याच्याकडून सोनसाखळी हिसकावून घेण्याचे १० गुन्हे पोलिसांनी वदवून घेतले. पाच लाखांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. मंगलानी गेल्या अनेक वर्षांपासून चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संजीव कांबळे आणि पोलीस निरीक्षक आचल मुदगल उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव परिसरात पुन्हा सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी जुन्या चेनस्नॅचरकडे नजर वळविली. सीसीटीव्हीत उपरोक्त गुन्ह्यात पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा वापरण्यात आल्याने लक्ष मंगलानीकडे वेधले गेले. मंगलानीविरुद्ध तब्बल ३३ गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्याकडे पांढरी अ‍ॅक्टिव्हा असल्याने तसेच तो सराईत गुन्हेगार असल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्यावर नजर रोखली. त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रारंभी कबुली देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंगलानीने पोलिसांच्या बाजीरावपुढे हात टेकत तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली. अवघ्या दीड महिन्यात त्याने हे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. धंतोली, सोनेगाव, बजाजनगर, प्रतापनगर, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या गुन्ह्यांपैकी पोलिसांनी मंगलानीकडून गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिव्हा आणि ४ लाख ९० हजार रुपये किमतीचे १४६ ग्राम सोन्याचे दागिने जप्त केल्याचेही उपायुक्त कदम यांनी सांगितले. ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक जितेंद्र बोबडे, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, राजकुमार त्रिपाठी, हवालदार रवींद्र गावंडे, प्रकाश वानखडे, विजय लेकुरवाळे, नायक सतीश पांडे, महेश कुरसंगे, बलजित ठाकूर, सैयद वहीद, श्याम गोरले, अश्विन पिल्लेवान यांनी बजावली.पानटपरी, सोने आणि एमडीकुख्यात अनिल मंगलानी खामल्यातील घरून चेनस्नॅचिंग करण्यासाठी बाहेर पडताना तो त्याच्या अ‍ॅक्टिव्हाची मागची नंबर प्लेट वाकडी करायचा. त्यामुळे सीसीटीव्हीत त्याच्या दुचाकीचा क्रमांक नीट येत नव्हता. गुन्हा केल्यानंतर लगेच खामल्यातील घरी जायचा. त्याच्या वडिलाची खामला चौकात पानटपरी आहे. तो पानटपरीवर बसून राहायचा. त्याला एमडी या अमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही पोलीस सांगतात. रात्री ११ नंतर मंगलानीच्या पानटपरीच्या आजूबाजूला गुन्हेगारांची, मादक पदार्थ तस्करी करणाऱ्याची नेहमी गर्दी बघायला मिळते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी