शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

संयुक्त शाळा अनुदान वाटपात कमी पटाच्या शाळांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:31 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानामध्ये शासनाने वाढ केली. परंतु ही वाढ शाळेच्या पटसंख्येवर आधारित असल्याने कमी पटाच्या शाळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शाळांना आपल्या पायाभूत गरजासुद्धा भागविणे कठीण जाणार आहे.

ठळक मुद्दे७५८ शाळांना केवळ ५००० अनुदान : अनुदानात वाढ करण्याची शिक्षकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानामध्ये शासनाने वाढ केली. परंतु ही वाढ शाळेच्या पटसंख्येवर आधारित असल्याने कमी पटाच्या शाळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शाळांना आपल्या पायाभूत गरजासुद्धा भागविणे कठीण जाणार आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या संयुक्त शाळा अनुदानात वाढ केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले. त्यामध्ये इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शाळांना पटसंख्येच्या आधारावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.३० पटसंख्येपर्यंतच्या शाळांना वर्षाला केवळ ५ हजार, ३१ ते ६० पटसंख्येपर्यंतच्या शाळांना १० हजार, ६१ ते १०० पटसंख्येपर्यंत २५ हजार, १०१ ते २५० पर्यंतच्या शाळांना ५० हजार, २५१ ते १००० पटसंख्येपर्यंत ७५ हजार व १००० पेक्षा जास्त पटसंख्या असणाºया शाळांना एक लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुदानातून विद्युत बिल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छताविषयक बाबी, इमारत देखभाल व दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, क्रीडा साहित्य दुरुस्ती, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान तयार करणे व इतर आवश्यक भौतिक सुविधेवर खर्च करायचा आहे. याशिवाय अध्ययन-अध्यापन साहित्य, वर्ग सजावट, विविध शालेय व सहशालेय उपक्रम, स्टेशनरी यावरसुद्धा लहान शाळांना खर्च करावाच लागतो.जि.प. नागपूर अंतर्गत १५३८ शाळांना २ कोटी ५२ लाख ४५ हजार रुपये अनुदान वितरित होणार आहे. यापैकी ७५८ शाळांची पटसंख्या ३० च्या आत आहे. त्यामुळे ७५८ शाळांना फक्त ५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हा सर्व खर्च ५००० एवढ्या कमी अनुदानात भागविणे शाळांना शक्य होणार नाही, परिणामी या शाळांच्या भौतिक सुविधा मोडकळीस येणार आहे. त्यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरून त्याचा विपरीत परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होणार आहे.कमी पटसंख्येच्या शाळेच्या अनुदानात वाढ करावीशाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांची देखभाल व दुरुस्ती, विद्युत बिल भरणे, क्रीडा व शैक्षणिक साहित्याची देखभाल व स्वच्छता उपक्रम यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता १ ते ६० पर्यंत पटसंख्या असणाºया शाळांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे सरचिटणीस अनिल नासरे, दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, मीनल देवरणकर, पुष्पा पानसरे, सुरेश श्रीखंडे, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, अशोक बांते, सुरेंद्र कोल्हे, दिगंबर ठाकरे, अशोक तोंडे, स्नेहा बांगडे, नीता बोकडे, विजय जाधव, विश्वास पांडे, अनिल वाकडे, जयंत निंबाळकर आदींनी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाfundsनिधी