शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियन समूह विकत घेणार इंडोरामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:43 IST

विदर्भातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प असलेल्या बुटीबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन विकत घेणार असल्याची माहिती इंडोरामातील सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअंकेक्षकांचे पथक बुटीबोरीत दाखल

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प असलेल्या बुटीबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन विकत घेणार असल्याची माहिती इंडोरामातील सूत्रांनी दिली.बुटीबोरीची इंडोरामा सिंथेटिक्स ही दिल्लीच्या ओमप्रकाश (ओपी) लोहिया यांची कंपनी असून ती पॉलिस्टर धागे व पॉलिमरचे उत्पादन करते. १९९३ साली इंडोरामा विदर्भात आली व कंपनीने १९९६ मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. दरम्यानच्या काळात कंपनीने प्रकल्पाचा विस्तार केला व पार्शिअली ओरिएंटेड यार्न (पीओवाय), पॉलिस्टर स्टेपल फायबर (पीएसएफ), फुल्ली ड्रॉन यार्न (एफडीवाय), ड्रॉ टेक्स्चराईज्ड यार्न (डीटीवाय) अशी कृत्रिम धाग्यांची मालिका पूर्ण केली. सध्या इंडोरामाची उत्पादन क्षमता वर्षाला ६.५० लाख टन असून गुंतवणूक ४५०० कोटीची आहे. इंडोरामामध्ये एकूण ३००० कामगार/ कर्मचारी नोकरीत आहेत.इंडोरामाने २००३ साली आपला स्पिनींग प्रकल्प पुण्याच्या चौधरी ग्लोबल समूहाच्या स्पेन्टेक्स इंडस्ट्रीजला विकून फक्त कृत्रिम धाग्यांवर लक्ष केंद्रित केले. इंडोरामाचे कृत्रिम धागे अनेक देशात निर्यात होतात.मात्र गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कृत्रिम धाग्यांची मागणी घटल्यामुळे इंडोरामाला आपले उत्पादन कमी करावे लागले व सध्या कंपनी आपली ३० टक्के क्षमता वापरत आहे. परिणामी कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. म्हणून लोहिया यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.इंडोरामा कॉर्पोरेशनचे मुख्यालय इंडोनेशियातील जकार्तामध्ये आहे. परंतु एस.पी. लोहिया व त्यांचे चिरंजीव अमित लोहिया हे लंडनमधून समूहाचा व्यवसाय नियंत्रित करतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या बुटबोरीच्या इंडोरामा सिंथेटिक्स प्रकल्पाची मूल्यांकन प्रक्रिया (ड्यू डिलीजन्स) सुरू असून त्यासाठी इंडोनेशियावरून १० ते १२ अंकेक्षकांचे पथक बुटीबोरीत दाखल झाले आहे. संपूर्ण विक्री व्यवहार जून-जुलैपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान याबाबतीत इंडोरामा सिंथेटिक्सचे अध्यक्ष व प्रबंध संचालक ओ.पी. लोहिया व कार्यकारी संचालक विशाल लोहिया यांचेशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

जगातील सर्वात मोठा कृत्रिम धागे बनवणारा समूहही कंपनी विकत घेणारी इंडोनेशियातील इंडोरामा कॉर्पोरेशन ही कंपनी ओपी लोहिया यांचे लहान बंधू श्री प्रकाश (एस पी) लोहिया यांची आहे. इंडोरामा कॉर्पोरेशन ही जगातील सर्वात मोठा कृत्रिम धागे बनवणारा समूह असून ३० देशात मिळून ७० कारखाने हा समूह चालवतो. इंडोरामा कॉर्पोरेशनची वार्षिक उलाढाल ८.४० अब्ज डॉलर्स (५९,००० कोटी रुपये) आहे व समूहात ३०,००० कर्मचारी आहेत.

टॅग्स :businessव्यवसाय