शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मस्कत-कोची-दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 17, 2025 18:11 IST

Nagpur : विमान तपासणीनंतर दुपारी ३ वाजता दिल्लीकडे रवाना

मोरेश्वर मानापुरेनागपूर : इंडिगोला विमानात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल मिळाल्यानंतर मस्कत-कोची-दिल्ली मार्गावरील इंडिगोच्या विमानाचे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास नागपूरविमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात १५७ प्रवासी होते. तपासणीनंतर हे विमान दुपारी ३ वाजता दिल्लीकडे रवाना झाले,

६ ई २७०६ क्रमांकाचे विमान सकाळी ९.२० वाजता कोची विमानतळावरून उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता दिल्लीत उतरणार होते. इंडिगो कंपनीला विमान क्रमांकाचा उल्लेख करून विमानात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल मिळाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन, विमान नागपूरला वळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आणि संपूर्ण विमान आणि प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना काहीही आढळले नाही. या घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळल्यापासून उड्डाणांबाबत सुरक्षा आणि चिंता वाढली आहे.

पोलिस उपायुक्त लोहित मतानी म्हणाले, आपत्कालीन लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानतळ सुरक्षा आणि बॉम्ब निकामी पथकांनी तातडीने सखोल तपासणी आणि चौकशी केली. विमानात संशयास्पद काहीही आढळले नाही. तपास सुरू असताना खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ