शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

भारताची संरक्षण यंत्रणा चीनपेक्षा कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:56 IST

भारताची यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे वर्चस्वासाठी ड्रॅगनच्या उचापती

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संरक्षण यंत्रणा व तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बलवान असल्याचे बोलले जात असले तरी भारतही काही कमी नाही. सैन्य कमी असले तरी आपणही मिसाईल, विमान व अण्वस्त्रांबाबत सक्षम आहोत. याशिवाय सियाचीन, लडाखचा भाग खडतर असला तरी परिस्थिती भारतासाठी अनुकूल आहे. कमी उंचीवरून विमाने उडवताना अधिक दारूगोळा नेता येतो, याउलट उंचावर असलेल्या चिनी सैन्याला ते अडचणीचे आहे. त्यामुळे आपली यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला. कर्नल पटवर्धन हे १९७५-७६ या काळात कॅप्टन म्हणून सियाचीन भागात तैनात होते. सियाचीनकडे जाणारे बेस शोधताना त्यांच्या टीमने या भागात पॅट्रोलिंग केली. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. कर्नल पटवर्धन यांनी लोकमतशी बोलताना या भागातील परिस्थितीची माहिती दिली. पूर्व हिमालयाच्या पेंगाँग सरोवरातून गलवान नदी निघते व ती पुढे लेह, काश्मीरमार्गे सिंधू नदीला जाऊन मिळते. गलवान खोऱ्याने काराकोरम पर्वताच्या खिंडीतून कजाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणमार्गे युरोपकडे जाणारा मार्ग निघतो.विशेष म्हणजे चीनचा २७ देशांमधून जाणारा बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प या काराकोरम खिंडीतूनच पाकिस्तानकडे जातो. त्यामुळेच चीनची धडपड सुरू आहे. त्यांनी जर या भागावर कब्जा केला तर भारतासाठी अडचणीचे होईल, म्हणून त्यांना दूर ठेवणे हा आपला प्रयत्न आहे. ६ जूनला गलवान खोºयात ड्रॅगनच्या हालचालीमुळे तणाव झाला. त्यानंतर सेनाधिकाऱ्यांमध्ये बोलणी झाली पण १५ जूनला ही धुमश्चक्री झाली. रात्री ११ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंच्या ४००-५०० सैन्यात संघर्ष झाला. यात निश्चितच चिनी सैन्याचे नुकसान अधिक झाले आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालय व लष्करी अधिकारी स्तरावर चर्चा सुरू आहे पण जमिनीवर सैनिकांना कारवाईची मुभा दिली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शरीर गोठविणारी थंडीगलवान नदीचे पात्र ५ ते ६ फूट खोल असेल; पण नदीचा वेग अधिक आहे. या खोऱ्यात १० महिने थंडी असते आणि दोनच महिने वातावरण साफ असते. मात्र जीवघेणी थंडी असते. येथील तापमान शून्य अंशाच्या खाली असते आणि या शरीर गोठविणाऱ्या थंडीत आपले जवान सीमेवर तैनात राहून शौर्याने लढत असतात. अशा कठीण परिस्थितीतही आपले सैनिक ड्रॅगनच्या कुरापतींशी लढण्यास सक्षम आहेत.

हा भारताचा जुना व्यापारी मार्गपेनोंग लेकमधून निघणारे गलवान नदीचे खोरे १५० ते २०० फुटाचे आहे आणि दोन्ही बाजूला उत्तुंग टेकड्या आहेत. जुन्या काळी हाच इतर देशांचा व्यापारी मार्ग होता. व्यापारी गलवान खोऱ्यातून येत पुढे लेह व काश्मीर मार्गे दिल्लीकडे जायचे. याच मार्गाने भारतावर आक्रमणही करण्यात आले आहे. दौलतबेग ओलडी हा मार्गाचा थांबा होता. विशेष म्हणजे नागपूर येथील एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याच खडतर बेसवर लढाऊ विमान यशस्वीपणे उतरविले होते.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान