शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:40 IST

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देनागपूरच्या  विधी क्षेत्रात आनंद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. विधिज्ञांनी हा भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एप्रिल-२०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी व दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिलासा दिला.भारताचे दावे खरे ठरलेआंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने मांडलेले कायदेविषयक मुद्दे खरे ठरले. जाधव यांना अटक करताना व त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी १५ न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. कायद्याच्या बाबतीत हा भारताचा फार मोठा विजय आहे. वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वालपाकिस्तानचा खरा चेहरा उघडआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आला. पाकिस्तान नेहमीच मानवाधिकरांचे उल्लंघन करतो हे स्पष्ट झाले. जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते. त्यांनी जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची संधीही दिली नव्हती. त्यामुळे जाधव यांना स्वत:चा बचाव करता आला नाही. आता जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य मिळू शकेल.अ‍ॅड. फिरदोस मिर्झाव्हिएन्ना कराराचे उल्लंघन सिद्धजाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. जाधव हे भारताचे हेर नसतानाही पाकिस्तानने त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याविरुद्ध खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात पाकिस्तान मानवाधिकार विसरून शत्रुत्वाच्या भावनेने वागला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणेभारताचा मोठा विजय झालाआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यामुळे भारताने मोठी लढाई जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी तब्बल १५ न्यायमूर्तींनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांच्यावर अन्याय केल्याचे सर्व जगाला कळले आहे. यापुढे पाकिस्तानला सांभाळून वागावे लागेल.अ‍ॅड. राजेंद्र डागा

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवnagpurनागपूर