शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राखीपासून दिवाळीपर्यंत सण ठरणार भारतीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 21:12 IST

ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासून दिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासूनदिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.गेल्यावर्षी तीन महिन्यांच्या या सणांमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या वस्तू देशात आयात झाल्या होत्या. व्यापाऱ्यांच्या संकल्पामुळे आता हा व्यवसाय भारतीयांना मिळणार आहे.देशातील रिटेल व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) सध्या देशात चिनी वस्तूंच्या बहिष्काराची राष्ट्रीय मोहीम राबवीत आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या राखी सणापासून ते २५ नोव्हेंबरला होणाऱ्या तुळशी विवाहापर्यंतच्या सर्व सणांमध्ये लागणाऱ्या वस्तू भारतीय बनावटीच्या असाव्यात, असे आवाहन सर्व व्यापारी संघटनांना केले आहे. सणांच्या तीन महिन्यात राखी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, तुळशी विवाह आदी सण येणार आहेत. प्रत्येक सणात भारतीय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी कॅटने एक व्यापक योजना तयार केली असून, सर्व वस्तूंची यादी तयार करीत आहे. ती ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, सणांशी संबंधित भारतीय वस्तू तयार करणारे निर्माता, कारागीर, लघु उद्योग, कुंभार, महिला उद्योजिका, स्वयंउद्योजक, स्टार्टअप आदींशी संपर्क साधून त्यांना किती प्रमाणात वस्तू तयार करायच्या आहेत, याची माहिती गोळा करण्याचा सल्ला कॅटची राज्यस्तरीय चमू आणि अन्य प्रमुख व्यापारी संघटनांना दिला आहे. दुसरीकडे त्यांच्या राज्यात उपरोक्त वस्तूंची किती विक्री आहे, याचीही माहिती एकत्र करण्यास म्हटले आहे. ही माहिती १५ जुलैपर्यंत तयार होणार आहे.एकत्रित केलेला डेटा कॅटच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात गोळा होईल आणि दोन्ही डेटाच्या आधारावर कोणत्या राज्यात किती वस्तू तयार होत आहेत आणि त्यांची राज्यात किती विक्री आहे, हे वगळता उर्वरित वस्तू कोणत्या राज्यात पाठविल्या पाहिजेत, याची विस्तृत माहिती गोळा होईल. त्यामुळे देशात मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ साधला जाईल, तसेच देशात भारतीय वस्तूचा तुटवडा जाणवणार नाही. या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील वाहतूकदारांची आघाडीची संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन किफायत दरात करणार आहे.भरतीया म्हणाले, भारतीय सणांच्या मोहिमेत कॅटच्या संबंधित राज्यातील महिला चमूची विशेष भूमिका राहणार असून, उद्योजिका आणि महिला गृह उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. राखी व राखी धागा, मिठाई, नमकीन महिला तयार करतील आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था कॅट करणार आहे. सणांमध्ये लहान-मोठ्या उद्योगातून २० हजार कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRakhiराखीDiwaliदिवाळी