शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेटर उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा; मित्रानेच केला विश्वासघात 

By योगेश पांडे | Updated: January 21, 2023 18:38 IST

व्यवस्थापक असताना उमेशऐवजी स्वत:च्याच नावावर खरेदी केली प्रॉपर्टी

नागपूर : आपल्या जिवलग मित्रावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू उमेश यादवला चांगलेच महागात पडले आहे. मित्राने पॉवर ऑफ अटॉर्नीचा उपयोग करून व्यवस्थापक असताना उमेशऐवजी स्वत:च्याच नावाने ४४ लाखांची प्रॉपर्टी खरेदी केली. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार घडल्यावर तब्बल सात वर्षांनंतर उमेशने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शैलेश दत्ता ठाकरे (३७, कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. उमेश व शैलेशची २००७ साली ओळख झाली. २०१० मध्ये उमेशची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यावर तो व्यस्त झाला. आयकर व इतर प्रशासकीय कामांसाठी त्याला शैलेश मदत करायचा. २०१३ पासून उमेशने शैलेशला व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले व त्याला दर महिन्याला ५० हजार रुपये वेतन देत होता. मित्र असल्याने याचा कुठलाही लेखी करारनामा केला नव्हता. उमेशने त्याच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी करून दिली होती. शैलेशने याचाच गैरफायदा घेतला.

२०१४ साली गांधीसागर तलावाजवळील एक प्रॉपर्टी ४४ लाखांमध्ये खरेदी करण्याचे ठरले. उमेशच्या वतीने शैलेश हा व्यवहार पाहणार होता. उमेशने शैलेशच्या बॅंक खात्यात ४४ लाख रुपये पाठविले. परंतु शैलेशने उमेशच्या ऐवजी स्वत:च्याच नावावर मालमत्ता खरेदी केली. जून २०१५ मध्ये उमेशने मालमत्ता खरेदी कधी करायचे असे विचारले असता ती मालमत्ता मी स्वत: घेतल्याचे शैलेशने सांगितले. यामुळे उमेशला धक्का बसला.

चांगला मित्र असल्याने उमेशने त्याला जास्त काही न बोलता पैसे परत दे किंवा मालमत्ता माझ्या नावावर कर असे म्हटले. मात्र तेव्हापासून शैलेशने अद्यापही यापैकी काहीही केलेले नाही. अखेरीस उमेशने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शैलेशविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास सोपविला आहे.

शैलेश साधायचा कंपन्यांशी समन्वय

शैलेशच्या माध्यमातूनच उमेश यादवने अगोदर चार मालमत्ता खरेदी केल्या होत्या. अगदी विविध कंपन्यांसोबत ब्रॅंड ॲंबेसेडर किंवा प्रमोशनसाठीदेखील समन्वय साधण्याची जबाबदारी शैलेशकडेच होती. संबंधित प्रकार हा २०१५ मध्ये घडला. यानंतर सात वर्ष लोटून गेल्यावर उमेशने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर