शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

भारत बंद; विदर्भात संमिश्र प्रतिसादाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:00 IST

राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दृष्य आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रतिसाद‘भारत बंद’साठी विरोधकांची एकजूटचौकाचौकात आंदोलनाची तयारीपोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दृष्य आहे. उपराजधानीत बंदला फारसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. येथे परंपरेनुसार मारबतची मिरवणूक निघाली असून काही बाजारपेठांमध्ये गर्दी आहे तर शहराच्या काही भागात बंद पाळला जातो आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहे. कार्यकर्ते मुख्य चौकात येऊन निदर्शने व घोषणा करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना येथेही कडकडीत बंद पाळला जातो आहे. गडचिरोली जिल्ह्यात आष्टी येथे सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर अहेरीत मात्र बंदचा कुठेच प्रभाव दिसून आला नाही.काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी, शेतकरी कामगार पक्षानेदेखील समर्थन दिले आहे. देशातील नागरिक दरवाढीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या बंदचे समर्थन करीत असल्याची भूमिका या पक्षांनी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसतर्फे सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथून निदर्शनांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, चाकरमानी, शेतकरी अशा सर्वांनाच पोहचली असताना सरकार मात्र याची कुठेही दखल का घेताना दिसत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. शहरात बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.या बंदला इतरही विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. हा बंद यशस्वी करण्याच्या रणनीतीबाबत काँग्रेसने रणनीती आखली असून चौकाचौकामध्ये निदर्शने करण्यात येणार आहे.काँग्रेसने पुकारलेल्या या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील समर्थन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांची भूमिका काय? महाल, इतवारी, सक्करदरा या परिसरातील दुकाने दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. दुपारनंतर व्यापारी आपली प्रतिष्ठाने उघडणार आहेत. मात्र शहरातील इतर भागांमध्ये नेमकी काय स्थिती राहणार, हे व्यापारी संघटनांनी स्पष्ट केलेले नाही.

शांतिपूर्वक निदर्शनेच करणारदरम्यान, भारत बंददरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये याची काळजी विरोधी पक्षांकडूनदेखील घेण्यात येणार आहे. बंदसाठी १८ ‘ब्लॉक’मध्ये पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आंदोलन पूर्णत: अहिंसात्मक असेल, असे विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले. बंदच्या तयारीसाठी शहर काँग्रेसतर्फे रविवारी ‘ब्लॉक’स्तरावर बैठकादेखील घेण्यात आल्या.

आज आॅटो बंदराफेल व पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरुद्ध काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्ष व संघटनांनीही समर्थन जाहीर करीत, या बंदमध्ये प्रत्यक्ष सहभगी होण्याचा निर्णय घेतला आहे. आॅटो संघटनेनेही बंदला समर्थन जाहीर करीत आॅटोसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या बंदला समर्थन करीत सोमवारी रस्त्यांवर आॅटो न चालवण्याचा निर्णय आॅटो संघटनांनी घेतला आहे.संपूर्ण विदर्भात तब्बल ८० हजार आॅटो सोमवारी रस्त्यांवर धावणार नाहीत, असा दावा आॅटो संघटनांनी केला आहे. विदर्भ आॅटो चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले की, आॅटो संघटनेतर्फे सोमवारी भारत बंदमध्ये सहभागी होऊन संविधान चौकात निदर्शने केली जातील.यासोबतच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (बॅरि. खोब्रागडे) यांच्यातर्फे यशवंत तेलंग आणि प्रा. विजय बारसे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध भारत बंदला समर्थन दिले आहे. पक्षातर्फे १० सप्टेंबर रोजी संविधान चौक येथून दरवाढीविरुद्ध स्वाक्षरी अभियानास सुरुवात केली जाईल. यासोबतच भीम शांती सेनेचे प्रेमदास चहांदे, नीलेश वाघमारे, महाविदर्भ जनमोर्चातर्फे गौतम माटे, योगेश ठाकरे यांनीही भारत बंदला समर्थन जाहीर केले आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद