शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:10 IST

एनटीसीएचे माजी सदस्य सचिव राजेश गोपाळ यांचा अभ्यास : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मागील दशकभरात वाघांची संख्या दुपटीने वाढली ही अभिमानाची व समाधानाचीही बाब आहे. मात्र, या वाढीला मर्यादा घालणे आता गरजेचे झाले आहे. व्याघ्रप्रेमी एनजीओंच्या मते ही गोष्ट नकारात्मक वाटत असली तरी देशातील वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह आता शक्य असल्याचे एक निरीक्षण आहे. वाघांची संख्या पाहता, ही मर्यादादेखील आता संपली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) चे माजी सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाळ यांनी 'सामाजिक वहनक्षमता व वाघ व्यवस्थापन' या संकल्पनेवर केलेल्या निरीक्षणातून हे वास्तव मांडले आहे. डॉ. गोपाळ यांच्या अभ्यासानुसार भारतात संरक्षित क्षेत्रे केवळ २ ते २.४ टक्के आहेत आणि यात जास्तीत जास्त ५ टक्के क्षेत्रापर्यंतच विस्तार होण्याची शक्यता आहे. या मर्यादित अधिवासात सर्वोत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त ४,००० वाघांचा निर्वाह शक्य आहे. काही संघटना, संस्था या वाघांची संख्या १०,००० पर्यंत नेण्याची चर्चा करतात, पण डॉ. गोपाळ यांच्या मते, हे 'जमिनीवरच्या वास्तवापेक्षा फारच वेगळं' ठरेल. 

काय आहे 'सामाजिक वहनक्षमता'?पर्यावरणीय दृष्टिकोनातून वहनक्षमता म्हणजे एखाद्या परिसंस्थेत किती वाघ राहू शकतात, हे ठरवणारे प्रमुख घटक म्हणजे अन्नसाखळी, नैसर्गिक अधिवास, पाण्याची उपलब्धता आदी; परंतु सामाजिक वहनक्षमता ही संकल्पना मानवी सहनशीलतेशी निगडित आहे. एखाद्या भागातील स्थानिक लोक संघर्ष न होता किती प्रमाणात वाघांचे अस्तित्व स्वीकारू शकतात? वाघांची संख्या जर अति झाली, तर ती लोकांना त्रासदायक वाटू लागते आणि संघर्षाची शक्यता वाढते. डॉ. गोपाळ यांच्या मते, जर आपण सामाजिक मर्यादेच्या पलीकडे वाघांची संख्या वाढवली, तर ते 'उत्पात करणारे प्राणी' म्हणून ओळखले जातील. सामाजिक वहनक्षमता लक्षात न घेतल्यास, ही यशोगाथा भविष्यात संघर्षकथांमध्ये रूपांतरित होऊ शकते.

जर सामाजिक मर्यादा ओलांडली, तर काय होईल?

  • मानव-वाघ संघर्ष वाढतो.
  • माणसांच्या दृष्टिकोनातून वाघ अडथळा ठरतो मग गावांमध्ये वाघ शिरले तर प्रतिकार सुरू होते.
  • प्रशासनाची अडचण वाढते. वाघ मारले जाऊ शकत नाहीत, त्यांचे स्थलांतरही करता येत नाही.
  • अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने पुढे गेली. त्यामुळे अधिवास ताब्यात ठेवण्यासाठी वाघांचे अंतर्गत संघर्ष वाढले.

महत्त्वाचे बिंदू देशात वाघांची संख्या - ३९८२

  • २०१४ ते २०२४ दरम्यान वाघांच्या हल्ल्यात ६६४ मानवी मृत्यू.
  • २०१४ ते २०२३ पर्यंत एकट्या महाराष्ट्रात ७०२१ पशुधनाचा मृत्यू
  • २०२२ साली मानवी मृत्यू ११० वर. त्यात महाराष्ट्रातील ७६ मानवी मृत्यू.
  • वाघांचे अस्तित्व सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तराखंड राज्यात एकवटले आहे.
  • देशात ५८ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. त्यातील काही प्रकल्पात वाघांची संख्या नगण्य आहे.

"देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रात विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मोजक्या राज्यात भरपूर व इतर राज्यात वाघच नाहीत. त्यामुळे वाघ मानव संघर्षसुद्धा शिगेला पोहोचला आहे. वाघांची संख्या वाढली ही आनंदाची बाब असली तरी वाढता संघर्ष आणि मानव मृत्यू ही चिंतेची बाब झाली आहे."- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर