शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहासाठी होणार स्वतंत्र कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:18 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. माहितीचा अधिकार कायदा असो की, मनरेगासारखी योजना असो, महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले आहे. राज्याची ही परंपरा अशीच कायम असून आता महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाचा पुढाकार : सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. माहितीचा अधिकार कायदा असो की, मनरेगासारखी योजना असो, महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले आहे. राज्याची ही परंपरा अशीच कायम असून आता महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी शासनाने राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठित केली आली आहे. या समितीमध्ये अध्यक्षांसह एकूण सात सदस्यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत तर विधि व न्याय विभागाचे सहसचिव अविनाश बनकर, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अ‍ॅड. केवल उके, मुंबईतील सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. संदेश वाघ, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.नागपूरचे कृष्णा इंगळे ह कामगार नेते असून यापूर्वी ते राज्य शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळ संशोधन समितीमध्ये होते. त्यांनी महापुरुषांचे वास्तव्य लाभलेली महाराष्ट्रातील एकूण ४२ स्थळे शोधून शासनाला सादर केली. ती सर्व स्थळे शासनाने मंजूर केली आहेत, हे विशेष.स्वजातीत विवाह करणाऱ्या मुलींसाठी कायद्याचे संरक्षण आहे. परंतु आंतरजातीय विवाह करणाºया मुला-मुलींना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतो. जीवन जगताना त्यांना अनेक अडचणी येतात. अनेक सामाजिक अडचणी निर्माण होतात. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मसुदा समिती यासर्व बाबींचा विचार करून एक आदर्श कायद्याच्या दृष्टीने मसुदा तयार करणार आहे. हा कायदा झाल्यास तो निश्चितच देशासाठीही एक नवी दिशा देणारा ठरेल, अशी शक्यता आहे.तीन महिन्यात अहवाल सादरराज्य शासनाने गठित केलेल्या या समितीला तीन महिन्यात आपला अहवाल सादर करावयाचा आहे. यासंबंधात गेल्या बुधवारी शासनने जी.आर. काढून तसे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक