शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शहरात वाढतोय मलेरिया!

By admin | Updated: September 13, 2015 02:36 IST

उपराजधानीत साथरोगाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूचे २७ रुग्ण आढळून आले आहेत. याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ३० रुग्णांची नोंद : ग्रामीणमध्ये रुग्ण संख्या रोडावली नागपूर : उपराजधानीत साथरोगाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूचे २७ रुग्ण आढळून आले आहेत. याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत ३० रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी ते मे २०१५ या कालावधीत सहा जिल्ह्यात ७ हजार २६६ मलेरियाग्रस्तांची नोंद झाली आहे. ढगाळ वातावरण, थंडी, पाऊस, मध्येच पडणारे कडकडीत ऊन या वातावरणातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणूंसोबतच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. शहरात डासांची संख्या वाढण्यामागे व्यवस्थित न झालेली नालेसफाई, जागोजागी साचलेले डबके व अनेकांच्या घरातील सुरू असलेले कुलर हे प्रमुख कारणे ठरत आहेत. मलेरिया आटोक्यात असल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून होत असला, तरी विदर्भातील नागपूर शहर-ग्रामीणसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहे. जानेवारी ते मे या कालावधीत ७ हजार २६६ मलेरिया रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. यात दोघांचा मृत्यू आहे. ‘एनोफिलिस’ डासांचा प्रकोप वाढल्यामुळे मलेरियाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात ६ हजार ४४४ मलेरियाग्रस्त आढळले आहे. शहरातही या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१४ मध्ये मलेरियाचे ४८ रुग्ण आढळून आले होते. या वर्षी जानेवारीमध्ये पाच, फेब्रवारीमध्ये चार, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये चार, मेमध्ये तीन, जुलैमध्ये सात तर आॅगस्टमध्ये चार, अशी एकूण ३० रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. यामुळे नागरिकांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)