शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणाचा कोटा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:27 IST

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१४ मध्ये शासनाने हा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये झाली. विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडले जातात. पण चार वर्षात केवळ २२५ विद्यार्थीच प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शक ले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या प्रशिक्षणासाठी जाहिरात काढली आहे. त्यात विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थ्यांचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे. हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देचार वर्षात केवळ २२५ विद्यार्थ्यांना मिळाले प्रशिक्षण : आदिवासी संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१४ मध्ये शासनाने हा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये झाली. विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडले जातात. पण चार वर्षात केवळ २२५ विद्यार्थीच प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शक ले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या प्रशिक्षणासाठी जाहिरात काढली आहे. त्यात विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थ्यांचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे. हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेने केली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. पैशाचा अभाव आणि इतर कारणामुळे आदिवासी विद्यार्थी या परीक्षेकरिता असणारे महागडे खासगी शिकवणी वर्ग लावू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा त्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय १५ जुलै २०१४ ला घेण्यात आला. त्याकरिता १ कोटी ८३ लाख २७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्यातील ९ विद्यापीठामार्फत २२५ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे प्रस्तावित होते. मात्र तीन वर्ष योजनेची अंमलबजावणी झालीच नाही. आदिवासी विकास परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळे जुलै २०१८ ला प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणाची पहिली २२५ विद्यार्थ्यांची बॅच संपली आहे. सन २०१४ चा निर्णय २०१८ ला अमलात आणल्यामुळे ९०० आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षणपासून मुकले. एका जिल्ह्यातून केवळ सहा विद्यार्थ्यांना संधीमहाराष्ट्र शासनाने २०१९ करीता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पूर्वीचीच विद्यार्थी संख्या कायम ठेवली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कार्य कक्षा चार जिल्ह्यात आहे. म्हणजे एका जिल्ह्यातून फक्त सहा आदिवासी विद्यार्थ्यांनाच संधी मिळेल. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास अशीच परिस्थिती आहे. आदिवासींची लोकसंख्या बघता प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थी संख्या १०० करण्यात यावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण लाभ घेता यावा यासाठी हे प्रशिक्षण अनिवासी न ठेवता निवासी ठेवावे.दिनेश शेराम, उपाध्यक्ष, आदिवासी विकास परिषद

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थी