शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर वाढवा; टुल्लू पंप जप्त करा :पदाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:50 IST

उपलब्ध जलसाठ्यातून नागपूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी पुढील महिनाभरासाठी नियोजन करा. टँकरची संख्या वाढवून टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आले.

ठळक मुद्देपाणी नियोजनासंदर्भात नेहरूनगर झोनमध्ये बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपलब्ध जलसाठ्यातून नागपूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी पुढील महिनाभरासाठी नियोजन करा. टँकरची संख्या वाढवून टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आले.टँकरच्या मुद्यावरून सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी रेशीमबाग व वंजारीनगर पाणीटाकीवर गोंधळ घातला. सत्तापक्षाचेच नगरसेवक गोंधळ घालून टँकरच्या फेऱ्या विस्कळीत करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील पदाधिकारी व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची नेहरूनगर झोनमध्ये बैठक घेण्यात आली. यात टँकर वाढवून टुल्लू पंप जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत नगरसेवकांनी आपल्या समस्या मांडल्या.यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, माजी महापौर प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मनिषा कोठे, स्नेहल बिहारे, समिता चकोले, मंगला गवरे, वंदना भुरे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील पाणीसमस्येवर चर्चा करण्यात आली. झोनमधील प्रभावित क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. प्रभावित क्षेत्रात टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. आयुक्तांच्या निर्देशानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.प्रत्येक वस्त्यांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यात यावा, पाण्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावर्षी पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याची जाणीव ठेवून नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा. अवास्तव पाणी वाया घालवू नये, असे आवाहन उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी यावेळी नागरिकांना केले. यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी