लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये जागांमध्ये यंदा शंभराहून अधिक वाढ झाली आहे. यंदा २२५ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर सर्वात वेगाने ‘आयआयएम-नागपूर’ची स्थापना झाली व २०१५ मध्ये प्रत्यक्षात वर्गदेखील सुरु झाले. पहिल्या वर्षी ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट) या अभ्यासक्रमात ६० पैकी ५३ प्रवेश झाले होते तर दुसऱ्या वर्षी हीच संख्या ५४ इतकी होती. २०१७ साली ५७ प्रवेश झाले होते. २०१८ साली ‘आयआयएम’च्या जागांमध्ये दुपटीने वाढ झाली. तेव्हा १२० पैकी १११ जागांवरच प्रवेश झाले. २०१९ साली १२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.२०२०-२२ या ‘बॅच’साठी प्रवेश क्षमता २२५ इतकी करण्यात आली आहे. यातील ९० जागा खुल्या प्रवर्गासाठी तर २३ जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. ६१ जागा ‘ओबीसी’, ३४ जागा अनुसूचित जाती व १७ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.
‘आयआयएम-नागपूर’मधील जागांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:15 IST