शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

देशहितासाठी आयकर संग्रहण वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:19 AM

योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. अधिकाऱ्यांनी विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेऊन देशहितासाठी आयकर संग्रहण वाढविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी येथे केले.

ठळक मुद्दे डॉ. हसमुख अधिया यांचे आवाहन : आयआरएस अधिकाऱ्यांचा दीक्षांत समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. अधिकाऱ्यांनी विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेऊन देशहितासाठी आयकर संग्रहण वाढविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी येथे केले.मानकापूर रोड येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) सभागृहात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय महसूल सेवेतील ७० व्या तुकडीच्या दिक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य बी. डी. विष्णोई, एनएडीटीचे प्रधान महासंचालक डॉ. पुष्पेंद्रसिंग पुनिया, अतिरिक्त महासंचालिका-३ लीना श्रीवास्तव, अतिरिक्त महासंचालिका-२ नौशिन जहॉ अन्सारी व अतिरिक्त महासंचालक-१ राजीव रानडे आणि प्रशिक्षण संचालक संजय धारिवाल होते.अधिकाºयांनी व्यापक क्षेत्र निवडावेडॉ. अधिया म्हणाले, वस्तू सेवा करासंदर्भात आतापर्यंत जीएसटी परिषदेच्या २७ बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीत वस्तू सेवा कराची आकारणी, अधिभार, कायदेशीर कार्यवाही या विषयी चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात आले. नोकरीमध्ये पद किंवा हुद्दा यापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग व दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आयकर अधिकाऱ्यांना इतर शासकीय विभागामध्ये प्रतिनियुक्तीच्या संधी मिळतात. त्याचा त्यांनी लाभ घेऊन एक व्यापक कार्यक्षेत्र निवडावे, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीत कर्मयोगाच्या पंचसूत्रीचा अवलंब करावा. कोणतेही कार्य करतांना आचारसंहितेला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी. आयकर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवरचा अनुभव अर्थमंत्रालयातील वरिष्ठांसोबत मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले.बी.डी. विष्णोई म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत व राष्ट्रनिमार्णामध्ये आयकर विभागाची महत्त्वाची भूमिका असते. आयकर अधिकारी कर संकलनाच्या माध्यमातून विकास कार्यासाठी देशाला लागणारा निधी शासनाच्या राजकोषात जमा करतात. मूल्यांकन अधिकारी म्हणून आयकर अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य बजावावे.या तुकडीतील एकूण १५३ अधिकाऱ्यांपैकी ४२ अधिकारी महिला आणि दोन रॉयल भूतान सेवेतील अधिकारी होते. तुकडीतील ४० अधिकाऱ्यांनी अवयवदाते म्हणून अवयवदान शिबिरात नोंदणी केली. विविध श्रेणीत १० अधिकाऱ्यांना सुवर्ण पदक तर सर्व १५३ अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सहयोगी प्रशिक्षण संचालक-२ ऋषी कुमार बिसेन यांनी आभार मानले. यावेळी अधिकाऱ्यांचे पालक, अकादमीतील शिक्षक, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NATIONAL ACADEMY OF DIRECT TAXESराष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीnagpurनागपूर