शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ : आयसोलेशनमध्ये ९२ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:03 IST

दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्येही रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेलामहानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथरोगाची शक्यता अधिक असते. याच दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. दूषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो. यामध्ये गॅस्ट्रो हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ यावाटे हा संसर्ग होऊ शकतो. उलटी-जुलाब ही रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारातून रुग्णांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटी आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मनपाच्या आयसोलेशन दवाखान्याच्या बाह्यरुग्ण विभागात गॅस्ट्रोच्या सुमारे दीड हजार रुग्णांनी तर आंतररुग्ण विभागात ४० रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असून, सोमवारी ८ एप्रिल रोजी ९२ रुग्णांनी उपचार घेतले.पाण्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्या-डॉ. गावंडेडॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत बाळगा. रस्त्याकडील हातठेल्यांवरील थंडपेय, बर्फाचा गोळा खाऊ नका. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळा. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत की नाही, याची खात्री करून घ्या. मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे. गॅस्ट्रोमध्ये उलटी व जुलाब होतात. ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय साखर आणि लिंबू घातलेले घरी तयार केलेले सरबत, इलेक्ट्रॉल किंवा ‘ओआरएस’ घेता येईल. या आजारात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचावयास हलके अन्नपदार्थ खावेत. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर