शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा न्यायालयातील कामकाजात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:39 IST

प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने आणि वकिलांवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच, त्यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देडीबीएची मागणी : उच्च न्यायालयाला निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने आणि वकिलांवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच, त्यांना निवेदन सादर केले.५ जूनपासून उच्च न्यायालयामध्ये आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ कामकाज होणार आहे. न्यायपीठांची संख्याही वाढविण्यात आली आहे. याच धर्तीवर जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजातही वाढ करण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे. कोरोना संक्रमणामुळे नियमित कामकाज बंद असल्याने जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या न्यायालयात सध्या केवळ अत्यावश्यक प्रकरणे ऐकली जात आहेत. परिणामी, वकिलांना आर्थिक व अन्य विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वकिलांचे अर्थार्जन गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. ही बाब लक्षात घेता या न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी कामकाजाच्या सर्व दिवशी पूर्ण वेळ कामकाज करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.अंतिम सुनावणी, लवाद प्रक्रिया अर्ज, अंतरिम आदेश मागणारे अर्ज, सुपूर्तनामा, कौटुंबिक वादाची प्रकरणे, तडजोडीची प्रकरणे, मोटर अपघात दावे इत्यादी प्रकारची प्रकरणे सहज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकली जाऊ शकतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शक्य नसलेल्या प्रकरणांवर नियमित पद्धतीने सुनावणी घेण्यात यावी. तसे करताना आवश्यक अटी लागू करण्यात याव्यात. तसेच, वकिलांना कार्यालय व घरून काम करता यावे याकरिता त्यांना इंटरनेटची लिंक पुरविण्यात यावी अशा काही महत्त्वपूर्ण सूचना संघटनेने निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. समीर सोहनी, अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. मनोज साबळे व अ‍ॅड. उमाशंकर अग्रवाल यांचा समावेश होता.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर