शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:24 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे.

ठळक मुद्देदेशात प्रथम क्रमांक : २८५७ कोटींचा महसूल मिळविला

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात मागील आर्थिक वर्षात ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी विभागीयस्तरावर एक चमू गठित करण्यात आली होती. यात अधिकारी, निरीक्षक, पर्यवेक्षक, अधीक्षक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि सांघिक कामगिरीतून नागपूर विभागाने महसुलाच्या बाबतीत उच्चांक गाठून भारतीय रेल्वेत पहिले स्थान मिळविले आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाने १९८१.६० कोटी रुपये मिळविले तर २०१७-१८ या वर्षात विभागाला २३५१.६८ कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात विभागाने ४४.२ आणि २१.५ टक्के अधिक उत्पन्न मिळविले. विभागीय प्रशासनाने वेकोलिसोबत निरंतर बैठक घेऊन वेकोलिच्या ७७६४ रॅक लोड केल्या. त्यापासून विभागाला २३८३.०१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षी विभागाने वेकोलिच्या ५९६१ रॅक लोड केल्या होत्या. त्याचप्रमाणे एसीसी कंपनीसोबत पाच वर्षांसाठी करार करून ४८९ रॅकच्या माध्यमातून १४३.१४ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. अंबुजा सिमेंटनेही तडाली गुड शेडमधृन माल वाहतूक करून ३५ रॅक मालाची वाहतूक केली. त्यापासून ९.१३ कोटी रुपये मिळाले. उत्तम ब्ल्यूवे स्टील वर्धा आणि मेसर्स जेएसडब्ल्यू स्टील कळमेश्वरच्या १४ आणि १८ तसेच बुटीबोरीच्या २ रॅकची वाहतूक करून ८.४० कोटी रुपये महसूल मिळविला. डीओसीच्या १३२.५ रॅकची वाहतूक करून ६०.४५ कोटी, एमएलएसडब्ल्यूच्या लोखंड आणि स्लेगच्या ९३ रॅक वाहतूक करून २८.७६ कोटी, बैतूल गुड्स शेडमधून साखरेच्या दोन रॅक तसेच बुटीबोरी गुड्स शेड येथून स्टोनच्या एका रॅकची वाहतूक केली. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेnagpurनागपूर