शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

नागपुरातील  हवालाकांडात पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:06 IST

हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणाऱ्या नागपूरच्या हवालाकांडात गुन्हेगार आणि पोलिसांनी संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली.

ठळक मुद्देलुटलेले अडीच कोटी जप्तभिसी गावात झाली जप्तीची कारवाईयुरियाच्या पोत्यात ठेवली होती रोकड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणाऱ्या नागपूरच्या हवालाकांडात गुन्हेगार आणि पोलिसांनी संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली. एवढेच नव्हे तर चार गुन्हेगारांच्या मदतीने हा दरोडा घालणारा नंदनवन ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे (वय ४६, रा. सिव्हील लाईन ), त्याचा रायटर विलास भाऊराव वाडेकर (वय ३९, रा. सुरेंद्रगड) आणि वाहनचालक पोलीस शिपाई सचिन शिवकरण भजबुजे (वय ३५, रा. महाविष्णूनगर, नरसाळा) या तिघांनाही गुरुवारी अटक करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हवालाची रोकड घेऊन जाणारी एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. या कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा नंदनवन पोलिसांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना केला होता. रायपूर (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिल्याचेही पोलीस सांगत होते. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतूक होत असतानाच कारमध्ये ५ कोटी, ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी, ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवाल या तरुणाने रविवारी दुपारी केला. त्यानंतर अली हुसेन जीवानी यांनीही तशीच तक्रार नोंदवली. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली.अहोरात्र चौकशीपोलिसांच्या प्रतिमेवर काळे फासणाऱ्या या प्रकरणातील वास्तव शोधण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर आणि परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात विविध पोलीस पथकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. स्वत: उपायुक्त भरणे दिवसरात्र या प्रकरणाच्या तपासात धावपळ करत होते. रोकड घेऊन पळून गेल्याचा आरोप असलेले कुख्यात गुन्हेगार सचिन नारायण पडगिलवार (वय ३७), रवी रमेश माचेवार (वय ३५), गजानन भालेनाथ मुंगणे (वय २७) आणि प्रकाश बबलू वासनिक (वय २२, सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी) हे बुधवारी महाबळेश्वरमध्ये पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर या प्रकरणातील चित्र एकदम स्पष्ट झाले. नंदनवन ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे याने त्याच्या मर्जीतील पोलीस कर्मचारी वाडेकर आणि भजबुजे यांना तसेच कुख्यात गुन्हेगार सचिन पडगिलवार, रवी माचेवार, गजानन मुंगणे आणि प्रकाश वासनिक यांच्याशी संगनमत करून कारमधील २ कोटी, ५४ लाख, ९२ हजार, ८०० रुपये लुटल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी लुटलेली रोकड जप्त करण्यासाठी आरोपींना बोलते केले. प्रत्येक आरोपी विसंगत माहिती देत होता. त्यामुळे उपरोक्त गुन्हेगारांसह पोलिसांच्या घरी आणि नातेवाईकांकडेही पोलिसांनी रोकड शोधण्याचे प्रयत्न केले. कोणताही आरोप होऊ नये म्हणून पोलीस प्रत्येक ठिकाणी इन कॅमेरा चौकशी करीत होते. मात्र, कुठेच काही मिळाले नाही. आरोपी दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना ‘बाजीरावची कडक सलामी’ देण्यात आली. पुन्हा एकदा या गुन्ह्याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी करवून घेतले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास गजानन मुंगणे याने ही रोकड आपल्या भिसीतील नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले.पोलीस उपायुक्त भरणे यांनी लगेच नंदनवनचे पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंके यांच्या नेतृत्वात पोलीस पथक गुरुवारी मध्यरात्री चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात पाठवले. त्यांनी आरोपी गजानन मुंगणेच्या वडिलांना गाठले. त्यांनी त्यांच्या शेतात खड्डा खोदून दडवून ठेवलेली २ कोटी ५० लाखांची रोकड काढून दिली.आरोपी मुंगणे हा मूळचा भिसी येथील रहिवासी आहे. तो नागपुरात वाहनचालक म्हणून काम करतो. आमच्या मालकाच्या घरी इंकम टॅक्सची धाड पडली. त्यामुळे ही रोकड घेऊन आलो, असे आरोपींनी मुंगणेंच्या वृद्ध वडिलांना सांगितले होते.विशेष म्हणजे, भोलेनाथ मुंगणे नावाप्रमाणेच भोळे आहे. ते शेतकरी आहेत. मुलगा ज्याच्याकडे काम करतो, त्या मालकाकडे इंकम टॅक्सची धाड पडल्याने ही रोकड सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे, असे माणून पहाटेच्या वेळी भोलेनाथ मुंगणे यांनी नोटांनी भरलेले पोते उचलून घरापासून दूर शेतात नेले. तेथे खड्डा खोदला अन् त्यात आधी ताडपत्री टाकली. त्यावरनोटाचे पोते ठेवून पुन्हा ताडपत्रीने झाकले (पाणी आला तर ओले होऊ नये म्हणून) नंतर त्यावर माती टाकली. त्यातील एक नोटही मुंगळे यांनी बाजुला काढून ठेवली नाही. पोलिसांना मुंगळे यांच्याकडून ती रोकड ताब्यात घेतली. ती नंदनवन ठाण्यात मोजून घेण्यात आली. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. त्यानंतर या दरोड्याचा मास्टरमार्इंड एपीआय सोनवणे आणि भजबुजे तसेच वाडेकर या दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर, त्या दिवशी रात्रपाळीत असलेले पीएसआय सोनुळे यांची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशीत त्यांचा दोष आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात उपायुक्त भरणे म्हणाले. ही रोकड कुणाची आहे अन् या प्रकरणात आणखी कुणी आरोपी आहेत काय, असा प्रश्न उपस्थित झाला असता, कसून चौकशी केली जात आहे. जे कुणी या प्रकरणात दोषी असतील, त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असेही उपायुक्त भरणे म्हणाले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ११ मे पर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा