शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसह वाशीम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:02 IST

नागपूर जिल्हा परिषदेसह वाशीम, अकोला, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष याचिकेवरील निर्णयाचा आधार घेऊन गुरुवारी सायंकाळी हे आदेश निघाले आहेत.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राज्य शासनाची अधिसूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेसह वाशीम, अकोला, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष याचिकेवरील निर्णयाचा आधार घेऊन गुरुवारी सायंकाळी हे आदेश निघाले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणच्या पंचायत समित्याही बरखास्त करण्यात आल्या असून प्रशासकांच्या नेमणुका करण्याचे आदेश निघाले आहेत.सर्वाेच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ३३९०४-३३९१०/२०१७ या क्रमांकाच्या विशेष अनुमती याचिकेवर १० जुलैला सुनावणी होवून आदेश पारित करण्यात आला होता. या आदेशात नोंदविलेली निरीक्षणे आणि त्यावरून दिलेल्या निकालाचा आधार घेवून जिल्हा परिषद नागपूर आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्या बरखास्त करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढले आहेत. या सोबतच, वाशीम, अकोला, धुळे आणि नंदूरबार या जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्याही तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आल्या आहेत.प्रशासकांची नियुक्तीया पाचही जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाºया पंचायत समित्या तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यासोबतच या सर्व ठिकाणी प्रशासकांनी अधिकार घेण्याच्या सूचना मंत्रालयातून निघाल्या आहेत. जिल्हा परिषदांवर तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांवर तेथील गट विकास अधिकारी प्रशासक म्हणून काम सांभाळणार आहेत. काय आहे प्रकरणया पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा अधिक झाला होता. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी -२०१२ मध्ये झाली होती. त्यानुसार फेब्रुवारी-२०१७ मध्ये कार्यकाळ संपणे अपेक्षित होते. मात्र नागपूर जिल्हा परिषदेला ३० मार्च २०१७ च्या पत्रानुसार मुदतवाढ मिळाली होती. अन्य ठिकाणच्या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर-२०१८ मध्ये संपणे अपेक्षीत होते. त्यांनाही मुदतवाढ मिळाली होती. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर ग्राम विकास विभागाने तातडीने हे आदेश काढले आहेत.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर