शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीसह नागपूर सजले : वस्त्यावस्त्यांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:09 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक, शांतिवन चिचोली येथे मोठ्या संख्येने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी महामानवास मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक, शांतिवन चिचोली येथे मोठ्या संख्येने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दीक्षाभूमी येथील मध्यवर्ती स्मारकाच्या डोमचे काम सुरूअसले तरी दीक्षाभूमी सजवण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर महामानवास मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर संयुक्त नागरी जयंतीनिमित्त येथे दोन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच दीक्षाभूमीवर आंबेडकरी बौद्ध अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी ९ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात येईल.संविधान चौकात भीम पहाटसंविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे येथेही अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. रविवारी सकाळी ६ वाजता महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे भीम पहाट हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.ड्रॅगन पॅलेसही सजलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेसवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना होईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित राहतील.शांतिवन चिचोली येथे बुद्धवंदनाशांतिवन चिचोली येथेही रविवारी सकाळी ११ वाजता बुद्धवंदना घेण्यात येईल. यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यावेळी शांतिवन चिचोलीचे प्रमुख संजय पाटील उपस्थित राहतील.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी