शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उपायुक्तांसह १३ पोलिसांना महासंचालकांकडून सन्मानचिन्ह घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:15 IST

पोलीस दलात १५ वर्षे उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल गुन्हे शाखा आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह ६ अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मानाचे पदक जाहीर झाल्याने शहर पोलीस दलात आनंदीआनंद झाला आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक घडामोड : शहर पोलीस दलात आनंदीआनंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलात १५ वर्षे उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल गुन्हे शाखा आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह ६ अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मानाचे पदक जाहीर झाल्याने शहर पोलीस दलात आनंदीआनंद झाला आहे.पोलीस दलात सेवा देताना कोणताही आरोप लागणार नाही, याची काळजी घेत कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. यंदा नागपुरातील तब्बल १४ जणांना हे पदक जाहीर झाल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी आयुक्तालयात आले. त्यामुळे आनंदीआनंद पसरला. गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, प्रतापनगरचे ठाणेदार सुनील शिंदे, सध्या सीबीआय मध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले पोलीस निरीक्षक संभाजी निवृत्ती मुरकुटे, सोनेगाव ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक किशोर सातोकर, अंबाझरी ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक शरद मिश्रा, विशेष शाखेचे हवलदार राहुल कन्नाके, विशेष शाखेचे हवलदार अरविंद दीक्षित, प्रतापनगरातील हवलदार देवेंद्र रायबोले, गुन्हे शाखेतील हवलदार संजय भजबुजे, हवलदार संतोष ठाकूर, पोलीस मुख्यालयातील हवलदार सचिन चिरडे आणि विशेष शाखेत कार्यरत असलेल्या नायक पोलीस शिपाई वैशाली शंकरराव शेंद्रे यांचा सन्मानचिन्ह प्राप्त करणारांमध्ये समावेश आहे. हे वृत्त पसरताच पोलीस दलासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सर्वांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन !उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी मिळालेल्या या सन्मानचिन्हाबाबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपरोक्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. एकाच वेळी आपल्या एवढ्या सहकाऱ्यांना मानाचे पदक जाहीर होणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हणून त्यांनी भविष्यात अशाच प्रकारे चांगली कामगिरी करून पोलीस दलाची मान उंच करावी, यासाठी डॉ. उपाध्याय यांनी उपरोक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयnagpurनागपूर