शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीत कोरोनाचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:22 IST

कोरोना आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी, यासंदर्भात शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्या दिल्या जाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देशिक्षक व सरकारी कर्मचारी संघटनांची शासनाला मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचाराकरिता होणाऱ्या वैद्यकीय खर्चाकरिता वैद्यकीय प्रतिपूर्ती दिली जाते. नेमक्या कोणत्या आजाराकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची तरतूद आहे याची यादी शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. यात २७ आकस्मिक आजारांचा व ५ गंभीर स्वरुपाच्या आजाराचा समावेश आहे. परंतु कोरोना हा नव्याने उद्भवलेला आजार असल्याने या आजाराचा समावेश या यादीत नाही. त्यामुळे कोरोना आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती शासकीय कर्मचाऱ्यांना मिळावी, यासंदर्भात शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुट्या दिल्या जाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे.शिक्षकांसाठी विशेष रजा मंजूर कराकोरोना संक्रमणामुळे बाधित झालेल्या व उपचारासाठी शाळेत अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना नियमावलीत कोणत्याही वैद्यकीय रजांची तरतूद नसल्याने कोरोना विषाणुचे संक्रमण झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले असल्यास विशेष रजा मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय सचिव बाळा आगलावे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.वैद्यकीय यादीत कोरोनाचा समावेश करासध्याचे शासन निर्णयात कोरोना आजाराच्या वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीची तरतूद नसल्याने या उपचाराकरिता झालेल्या खर्चाची वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणे शक्य नाही. त्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या आजाराचे यादीत कोरोनाचा समावेश करण्यात यावा , अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांचेसह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ सुरेश श्रीखंडे, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, सुरेंद्र कोल्हे, मीनल देवरणकर पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे , दिगांबर ठाकरे, हेमंत तितरमारे,अंकुश कडू, अशोक तोंडे, रमेश कर्णेवार, धर्मेंद्र गिरडकर, दिगांबर शंभरकर, दीपक उमप आदींनी शासनाकडे केली आहे.शासन आदेश निर्गमित करावासरकारी कार्यालयात जागा नसल्याने कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णालयामध्ये आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविल्यावर त्याला मंजुरी मिळत नाही. त्यामुळे शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी तातडीने शासन निर्णय निर्गमित करावा व कॅशलेस योजना लागू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, सी.वाय. सातघरे, देवेंद्र सोनटक्के, गिरीधारी चव्हाण, ओमप्रकाश धाबेकर, सतीश अवतारे यांनी आरोग्यमंत्र्यांना केली आहे.खासगी रुग्णालयात पैसे भरा नंतरच उपचारशासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयात भरमसाट खर्च येत आहे. प्रथम लाखो रुपये भरा व नंतरच उपचार करा, अशी भूमिका या रुग्णालयांनी घेतली आहे. सर्वच शासकीय कार्यालयात कोरोना आजार शिरला असून वरिष्ठ अधिकारी ते शिपाई बाधित होत आहेत. कोरोनाच्या आजाराची वैद्यकीय प्रतिपूर्ती नसल्यामुळे उपचार घेण्यास कर्मचारी उत्सुक नाही. खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचारासाठी वैद्यकीय प्रतिपूतीर्ची तरतूद करावी, अशी मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी शासनाला केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी