शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या :हॉकर्समध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:24 IST

वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृत्तपत्र विक्रेत्यांना (हॉकर्स) पहाटेच्या वेळी निर्जन ठिकाणी मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत आणि रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून करण्यात आली आहे.वाचकांना सकाळी वृत्तपत्र मिळावे म्हणून वृत्तपत्र विक्रेतेबांधव पहाटेपासून परिश्रम घेतात. कडाक्याची थंडी असो अथवा पावसाचे दिवस असो ही मंडळी पहाटे उठून वेगवेगळ्या ठिकाणी वृत्तपत्रांचे गठ्ठे घ्यायला जातात. तेथून ते वेगवेगळ्या भागातील नागरिकांकडे पोहचवितात. रस्त्यावर कुणी असो नसो वृत्तपत्र विक्रेते मात्र हमखास बघायला मिळतात. हे जाणून असल्यामुळे की काय चोर-लुटारूंनी वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याची मालिका सुरू केली आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या भागात वृत्तपत्र विक्रेत्यांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. माटे चौकात मंगळवारी पहाटे ४ वाजता किरण वाघमारे यांना लुटण्यात आले. त्यापूर्वी कोतवालीत अनिल शाहू यांना लुटण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी बजाजनगरात ओमकेश गर्गे यांनाही मारहाण करून एक हजार रुपये लुटण्यात आले होते. त्याच्या तक्रारीही नोंदविण्यात आल्या; मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये दहशत आणि रोष निर्माण झाला आहे.आयुक्तांकडून आश्वासनअशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात आणि आरोपींना तातडीने पकडण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची मंगळवारी भेट घेतली.जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेशजी नागलकर तसेच मंगेश वासनिक, राकेश आकरे, नीळकंठ निंबर्ते, राम पांडे, राजेंद्र धंगारे, नितीन चतूरकर, अमोल तितरमारे, सुजित नेमाडे, गौतम मेश्राम, राजकुमार नगरारे, अनिल शाहू, नाना गडंलेवार, प्रवीण धार्मिक, मनीष राजनकर, अशोक वाटेकर यांनी लुटमारीच्या घटनांची आयुक्तांना माहिती दिली. आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी योग्य त्या उपाययोजना करून यापुढे अशा घटना घडणार नाही, यासाठी पोलीस प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Robberyदरोडाnagpurनागपूर