शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमधील घटना :  नऊ तास मृतदेह उचललाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:38 IST

मेडिकलच्या वॉर्ड क्र. २३ मध्ये सिकलसेलच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तब्बल नऊ तास मृतदेह उचललाच नाही.

ठळक मुद्दे परिचारिकेवर हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या वॉर्ड क्र. २३ मध्ये सिकलसेलच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तब्बल नऊ तास मृतदेह उचललाच नाही. या प्रकरणाने मेडिकलमध्ये खळबळ उडाली. अखेर वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही वरिष्ठ डॉक्टरांनी समजूत काढल्याने प्रकरण निवळले. या प्रकरणाची अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.सुनील सुशांत सराटे (२३) रा. कुही फाटा, उमरेड रोड असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सुनील हा सिकलसेलचा रुग्ण होता. त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मेडिकलमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासून औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २३ मध्ये भरती केले. उपचाराला सुरुवात झाली. परंतु पहाटे त्याची प्रकृती गंभीर झाली. याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला दिली. परंतु परिचारिकेने याकडे दुर्लक्ष केले, असा नातेवाईकांचा आरोप आहे. याचदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे तणाव वाढला. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मृतदेह वॉर्डात होता. यादरम्यान नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्याकडे तक्रारही केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व इतरही वरिष्ठ डॉक्टरांनी नातेवाईकांची समजूत काढली. अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची डॉ. मित्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवारी नेमके प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयDeathमृत्यू