शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी पुलाची घटना अत्यंत दुर्दैवी; धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 12:40 IST

मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे.

ठळक मुद्देकेंद्राचे मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे.अंधेरीतील पादचारी गोखले पुल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या एकंदरीत कारभारावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.अंधेरी स्थानकाचा पादचारी पूल कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी मुंबईतून कोट्यवधी रुपयांचा कर रुपात निधी मिळत असताना मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे का लक्ष दिले जात नाही असा सवाल सरकारला केला आहे.मुंबईच्या उपनगरीय रेल्वे अपघातांच्या घटना वारंवार घडत असताना तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यापेक्षा एकदाच उपनगरीय रेल्वेचा सर्व्हे करुन कोणत्या मुलभूत सुविधा अपेक्षित आहेत याचा आढावा घेवून तरतूद करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.राज्य सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहेसध्याच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना इतकं हतबल व्हावे लागत आहे की, शेतकऱ्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याइतपत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असताना सरकार मात्र सध्या धृतराष्ट्राची भूमिका पार पाडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.पेरणीचा हंगाम सुरु झाला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही असल्याची बाब समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि भल्याचा निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही.पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी अधिकारी करु लागले आहेत इतकी हतबलता शेतकऱ्यांमध्ये आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना नक्कीच लाज आणणाऱ्या आहेत असे प्रतिपादन मुंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Andheri Bridge Collapsedअंधेरी पूल दुर्घटनाDhananjay Mundeधनंजय मुंडे