शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:32 IST

शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकमत एडिटोरियल ग्रुुपचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तीन दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी, शेखावत येणारपहिल्या दिवशी तीन सत्रात संत्र्यावर मंथनसंत्र्याच्या नारंगी रंगात रंगले संपूर्ण शहरतीन दिवसात एकूण ६० कार्यक्रमांचे आयोजनसंध्याकाळपासून रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकमत एडिटोरियल ग्रुुपचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तीन दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनीट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी नागपुरात येत आहेत. संत्र्याच्या नारंगी रंगात संपूर्ण शहर रंगले असून या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकºयांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. या विषयावर पहिल्या दिवशी तीन सत्र होतील.शनिवारी १६ डिसेंबर रोजी उद्घाटनीय सत्रानंतर कवी सुरेश भट सभागृहात दुपारी २.३० ते ३.१५ यादरम्यान इस्रायलचे तज्ज्ञ सिगालित बेरेन्झॉन हे ‘तोडणीनंतरची संत्रा प्रक्रिया : शेतीतून थाळीपर्यंत’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी ३.१५ ते ३.३० वाजतापर्यंत थिंपू, भूतानच्या कृषी व वनमंत्रालयाचे जिग्मे तेनझिन हे संत्रा उत्पादकांना माहिती देतील.दुपारी ३.३० वाजतापासून सायंकाळी ५ पर्यंत तांत्रिक सत्रामध्ये ‘संत्रा लागवडीमधील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ मान्यवर संत्र्याच्या शेतीविषयी तांत्रिक सादरीकरणासह मार्गदर्शन करतील. याअंतर्गत ‘भारतातील संत्रा लागवड : भविष्यातील वाटचाल’ या विषयावर केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)चे संचालक डॉ. एम.एस. लदानिया हे तांत्रिक सादरीकरण करतील.जागतिक संत्रा महोत्सवाचे आज उद्घाटनयासोबतच सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. ए. के. श्रीवास्तव हे ‘संत्र्यातील पौष्टिकत्व व्यवस्थापनातील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. यानंतर सीसीआरआयच्या वैज्ञानिक डॉ. एन. विजयकुमारी ‘शुट-टिप-ग्रॅफ्टींग आणि इतर टिश्यू (उती) कल्चर तंत्र’ या विषयावर तांत्रिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करतील. यानंतर ‘आधुनिक नर्सरी व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. आय.पी. सिंह हे माहिती देतील.

टॅग्स :nagpurनागपूर