शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

हिऱ्यांच्या लखलखाटात ‘इंट्रिया’चे उद्घाटन; प्रदर्शनाला अनेक मान्यवरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:57 IST

Nagpur News स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन आज लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे.

ठळक मुद्देपारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम

नागपूर : हिरा हा सौंदर्याचे, कलात्मकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिऱ्याला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असा हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन आज शनिवारपासून लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारे दागिने ही ‘इंट्रिया’ची खास ओळख. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या कल्पना-कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. या समारंभाला रूपेश दाणी, हिना गोयल, पोयाशा गोयल, डॉ. आयुष्मा पाडिया, शिखा शर्मा, अपेक्षा राय, दीपक देवसिंघानी, डॉ. विनोद बोरा, माधुरी बोरा, रिचा बोरा, किरण दर्डा, जया आंभोरे, डॉ. आस्था खेमुका, नीना जैन, रवींद्र गांधी, शैला गांधी, कविता खेमका, अंशुमन बघेल आदी उपस्थित होते.

अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे सृजनात्मक कलात्मकतेचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील डिझाइन्स व अनोखे रचनाकौशल्य मनाला भावल्याखेरीज राहत नाही. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रत्येक दागिन्यांच्या डिझाइन्सवर आणि त्याच्या कलाकुसरीवर हिऱ्यांच्या दागिन्यांवर प्रेम करणारे रसिक लुब्ध झाले.

- बहुसंख्य दागिने येलो आणि पिंक गोल्डमध्ये - पूर्वा कोठारी

या प्रदर्शनातील विशेषता सांगताना डिझायनर पूर्वा कोठारी म्हणाल्या, दिवाळी आणि सणासुदीच्या मुहूर्तावर उत्कृष्ट कलात्मकतेसह संस्कृती आणि परंपरांचा अनोखा मेळ साधणाऱ्या दागिन्यांचे डिझाइन्स प्रदर्शित करण्यात आले आहे. हे दागिने आकर्षक किमतीत भेटवस्तूच्या स्वरूपात देण्यासाठीही तयार करण्यात आले आहेत. इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा ‘स्टायलिश’ आणि ‘डिफरंट’ आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात बहुसंख्य दागिने व्हाइट गोल्ड, येलो गोल्ड आणि पिंक गोल्डने तयार केले आहेत. यात इअररिंग्ज, रिंग्ज, कंठहार, कफलिंग्ज आणि ब्रायडल सेट्स आदींचा समावेश आहे. जास्तीत जास्त वेळ ‘कम्फर्टेबली’ हिऱ्यांचे कलात्मक दागिने घालता यावे म्हणून यंदा खास ‘लाईट वेट’ दागिन्यांची शृंखला आम्ही सादर केली आहे. त्यामुळे ‘इंट्रिया’चे हिऱ्यांचे दागिने केवळ लग्न समारंभच नव्हे तर प्रत्येक प्रसंगात सहजपणे घालता येतील, असे आहेत. अलीकडे सोने आणि हिऱ्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी येथील दागिन्यांच्या किमती वाढविण्यात आलेल्या नाहीत. २५ हजारांपासून ते पुढे याच्या किमती आहेत.

-विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रशंसा

इंट्रिया प्रदर्शनात यंदा हिऱ्यांच्या दागिन्यांची कुठली शृंखला सादर करण्यात येणार याबाबत बरेच कुतूहल होते. यामुळे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज दिवसभर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हिरेप्रेमींनी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी फुलली होती. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या प्रदर्शनाची प्रशंसा केली.

-प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस

दसरा, दिवाळी आणि सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आयोजित हे प्रदर्शन सीमित कालावधीसाठी आहे. हे प्रदर्शन उद्या २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागपूरकरांसाठी सुरू राहणार आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटVijay Dardaविजय दर्डा