शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात नव्या मोबाईल शॉपीचे चोरानेच केले 'उद्घाटन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:19 IST

दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी दिवसा उद्घाटन झालेल्या दुकानावर नजर ठेवली. रात्रीच्या वेळी त्या मोबाईल शॉपीचे मागील बाजूचे दार तोडून प्रवेश केला आणि तेथून तब्बल १४,६५० रुपयांचे मोबाईल हॅन्डसेटसह इतर साहित्य लंपास केले.

ठळक मुद्देभिवापुरात मोबाईल शॉपी फोडलीदोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलने भल्या-भल्यांना वेड लावले आहे. त्यातच बालकांमध्ये मोबाईलची वेगळीच ‘क्रेझ’ आहे. त्यातूनच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी दिवसा उद्घाटन झालेल्या दुकानावर नजर ठेवली. रात्रीच्या वेळी त्या मोबाईल शॉपीचे मागील बाजूचे दार तोडून प्रवेश केला आणि तेथून तब्बल १४,६५० रुपयांचे मोबाईल हॅन्डसेटसह इतर साहित्य लंपास केले. मात्र हेच मोबाईल आणि साहित्य विकत असताना ‘ते’ दोघेही पकडले गेले. चोरीचा हा प्रकार भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. १८) मध्यरात्रीनंतर १.३० वाजताच्या सुमारास घडला.आवेश अलीम पटेल शेख (२३, रा. भिवापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. बसस्थानकालगत त्याने मोबाईल शॉपी सुरू केले. या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी झाले. दरम्यान भिवापुरातीलच १३ आणि १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकांची नजर या दुकानातील मोबाईलवर पडली. त्यातूनच त्यांनी चोरी करण्याचा बेत आखला. यासाठी दुकानाचा चौफेर फटका मारला. सायंकाळच्या वेळी त्या दोघांचेही पालक शहरातीलच एका वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तीच संधी साधून ते दोघेही घराबाहेर निघाले. रात्री १.३० वाजताच्या सुमारास या दोघांनीही दुकानाचे मागील दार लोखंडी सळाकीने उघडून आत प्रवेश केला. दुकानातील मोबाईल हॅन्डसेटसह मोबाईल बॅटरी, चार्जर आदी एकूण १४,६५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.शुक्रवारी सकाळच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आवेश गेला असता त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबत त्याने भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासाअंती चोरीचा पर्दाफाश झाला. पुढील तपास ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत नैताम, दीपक जाधव करीत आहे.मोबाईल विक्रीमुळे पकडले गेलेया प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान मोबाईल आणि इतर साहित्य विकण्यासाठी दोन विधिसंघर्षग्रस्त बालक फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल हॅन्डसेट, मोबाईल बॅटरी, चार्जर, हेडफोन, ब्ल्यूटूथ स्पिकर, सीपीयू केबल असा १४,६५० रुपयांच्या मुद्देमालासह लोखंडी सळाक जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत नागपुरातील बाल न्यायालयापुढे हजर केले.

टॅग्स :Crimeगुन्हा