शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

नागपूर शहर पोलिसात ‘किंग’ होते इनामदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:33 IST

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते.

ठळक मुद्देउपायुक्त, आयुक्त म्हणून पार पाडली जबाबदारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. अतिशय न्यायप्रिय व कर्तव्यदक्ष असलेल्या इनामदार यांनी पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त म्हणून नागपूर शहराची कमान सांभाळली होती. इनामदार यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसात त्यांची ख्याती राहिली आहे.मुंबईकर असलेले इनामदार यांचे नागपूरशी सौख्य राहिले आहे. त्यांचे अनेक मित्र नागपुरात आहे. मित्रांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात त्यांची ये-जा राहत होती. येथे आल्यानंतरही ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी आतिशय आत्मियतेने भेटत होते. इनामदार यांची १९७५ मध्ये उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते. पोलीस आयुक्तांचे पद महानिरीक्षकाच्या समकक्ष असते. त्यांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अवस्था विस्फोटक झाली होती. स्वत: इनामदार यातून वाचले होते. पोलिसांना ही स्थिती निपटण्यासाठी फायरिंग करावे लागले. यात नऊ लोकांचा जीव गेला. त्यामुळे तत्कालीन सरकारसुद्धा दबावात आले होते. इनामदार यावेळी कारवाईची पर्वा न करता आपल्या भूमिकेवर ठाम होते.इनामदार यांच्या कार्यकाळात मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट (मिसा) दहशत होती. इनामदार यांनी या कायद्याचा भरपूर वापर केला. त्यांच्या काळात ३६ आरोपी व अवैध धंद्यात गुंतलेल्यांविरुद्ध मिसा अन्वये कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील आरोपींनी पळ काढला होता. इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आयुक्त असतानाही पायी सवारीइनामदार हे व्यायामाला महत्त्व देत होते. बहुतांश त्यांच्या मुंबई-दिल्ली वाऱ्या असायच्या. बरेचदा ते सोनेगाव विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानापर्यंत पायीच जायचे. तत्कालीन पोलीस अधिकाºयांनी त्यांना बरेचदा सामान्य व्यक्तीप्रमाणे पायीच घरी जाताना बघितले. ३५ वर्षात २९ ट्रान्सफरइनामदार आपल्या भूमिकेशी कधीही समझोता करीत नव्हते. याच कारणामुळे त्यांच्या ३५ वर्षातील सेवेत २९ वेळा ट्रान्सफर झाली. जळगाव सेक्स स्कॅण्डलच्या चौकशीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते जेव्हा पोलीस महासंचालक होते, तेव्हा सत्ता परिवर्तन झाले होते. राजकीय नेत्यांशी मतभेदामुळे त्यांनी स्वेच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तDeathमृत्यू